रस्ता खचून महिना झाला; तरीही काम कासव गतीने काम! 

रस्ता खचून महिना झाला; तरीही काम कासव गतीने काम! 

मोखाडा : तालुक्‍यातील पालघर-वाडा-देवगाव रस्त्यावरील आमले घाटातील खचलेला रस्ता महिन्याभरानंतरही दुरुस्त झाला नसल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या रस्त्यावर 20 सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून राज्यमार्ग खचला होता. तेव्हापासून अवजड वाहनांसह परिवहन सेवाही ठप्प झालेली आहे. 

यामुळे दुर्गम भागातील प्रवाशांसह दिवाळीला गावी जाणाऱ्यांचेही प्रचंड हाल झाले. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने दुर्लक्ष केल्याने याच्या दुरुस्तीचे काम तब्बल दोन आठवडे उशीराने सुरू झाले. तसेच, सध्याही हे काम संथ गतीने सुरू आहे. 

दिवाळीच्या पूर्वसंध्येला असंख्य नोकरदार याच मार्गावरून नंदुरबार, औरंगाबाद, कोपरगाव, शिर्डी, नाशिक आदी ठिकाणी जात असतात. पण या राज्य मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला विलंबाने आणि अत्यंत कमी मजुरांच्या साह्याने सुरवात केल्याने परिवहन सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे या भागातील प्रवाशांना लांबच्या मार्गाने आणि जादा पैसे मोजून गावी जावे लागले आहे. 

दरम्यान, दिवाळी संपून आता गावी गेलेले चाकरमानी पुन्हा आपल्या कामावर परतले आहेत; पण या कामाची स्थिती मात्र 'जैसे थे'च आहे. एक महिना होऊन गेल्यानंतरही हा रस्ता बससेवेसाठी तयार न झाल्याने प्रवासी संतापले आहेत. 

रस्ता खचल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने बससेवा बंद केली होती. तसेच, चार ते पाच दिवसांत खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती करून बससेवा सुरू केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे मोखाडा येथील उपअभियंता शैलेश शिंदे यांनी सांगितले होते. पण महिला उलटून गेल्यानंतरही या कामाची स्थिती निराशाजनकच आहे. केवळ पाच ते आठ फुटांपर्यंत दगड रचून 'गेबियन वॉल'चे काम आतापर्यंत झाले आहे. आणखी 30 ते 40 फूट काम उचलायचे बाकी असल्याने या कामाला आणखी एक महिन्याहून अधिक कालावधी लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com