मुंबईतील 'आर. के. स्टुडिओ'ला लाग; दोन मजले जळून खाक 

निलेश मोरे
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मुंबई : सायन पनवेल येथील प्रसिद्ध राज कपूर स्टुडिओला (आर. के. स्टुडिओ) आज (शनिवार) दुपारी अडीचच्या सुमारास आग लागली. या आगीत स्टुडिओचा पहिला आणि दुसरा मजला जळून पूर्णपणे खाक झाला आहे. 

हे मजले रिकामे असल्याने सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला मिळताच सात बंब घटनास्थळी दाखल झाले. तासाभरानंतर ही आग आटोक्‍यात आणण्यात यश आले. अद्याप आगीचे कारण समजलेले नाही; मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

या स्टुडिओला लागलेल्या आगीमुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. या मार्गावर धुराचे लोट पसरले होते.