सोनसाखळी चोर टोळीला अटक

सोनसाखळी चोर टोळीला अटक

ठाणे : शहरात धुमाकूळ घातलेल्या इराणी टोळीच्या सात सोनसाखळी चोरांना ठाणे पोलिसांच्या ऍन्टी रॉबरी सेलने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 17 गुन्ह्यातील 8 लाख 27 हजारांचे सोन्याचे दागिने व चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.

यातील तीन जण मोक्का गुन्ह्यातील आरोपी असून सर्वांना न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता.29) पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. 

सर्फराज बेग, मोहम्मद फिरोज सय्यद, जॉन परवेज सय्यद, सर्फराज जाफरी, यास्सर बेग, रिझवान ईस्माईल शेख आणि अली ऊर्फ मामू शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील मोहमद सय्यद, जॉन सय्यद आणि सर्फराज जाफरी हे तिघेही मोक्का गुन्ह्यातील आरोपी असून त्यांच्यावर वागळे इस्टेट, कोळशेवाडी आणि नारपोली पोलिस ठाण्यात मोक्काअंतर्गत गुन्ह्यांची नोंद आहे.

सर्फराज आणि रिजवान हे सराईत गुन्हेगार आहेत. काही दिवसांपूर्वी कळवा, पारसिकनगर भागात रिझवान ईस्माईल शेख या सोनसाखळी चोराला कळवा पोलिसांनी पाठलाग करून पकडले होते. रिझवानच्या चौकशीत त्याचा साथीदार अली शेख यालाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख 93 हजार किमतीचे दागिने हस्तगत केले.

त्यांनतर ठाण्यात सोनसाखळी चोरीच्या इराणी टोळीतील काही जण राजस्थानच्या अजमेर येथे लपल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्याआधारे पथकाने सापळा रचून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख 35 हजाराचे दागिने हस्तगत केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com