पालिका मुख्यालयातील आपात्कालीन कक्ष पडले ओस...

रविंद्र खरात 
रविवार, 20 ऑगस्ट 2017

आपात्कालीन कक्षात 24 तास अधिकारी असणे गरजेचे आहे. नसेल तर ती गंभीर बाब आहे. निवडणूक कामामुळे मनुष्यबळ कमी आहे. मात्र पर्यायी अधिकारी का दिला नाही याची जरूर चौकशी करू पुन्हा या घटना घड़णार नाही याची दक्षता घेण्याची सूचना दिल्याची माहिती पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी सकाळला दिली.

कल्याण : मीरा भाईंदर महानगर पालिका निवडणुकीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 350 हून अधिक अधिकारी कर्मचारी जुंपल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयामधील आपात्कालीन कक्ष ओस पडले होते. अखेर आयुक्त पी. वेलरासू यांच्या लक्षात येताच दुपारी 2 नंतर तेथे एक अधिकारी रुजू झाला. मात्र पावसाळ्यात पालिका प्रशासन किती गंभीर आहे हे समोर आले आहे. 

पावसाळ्यात 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत सर्वच सरकारी यंत्रनेने नागरीकाना मदतीसाठी आपात्कालीन कक्ष सुरु करणे अपेक्षित आहे, त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर पालिकेने 24 तास आपात्कालीन कक्ष सुरु केला आहे, या कक्षाला महानगरपालिका हद्दीतील 10 प्रभाग क्षेत्र कार्यालय जोडली गेली आहेत . पावसाळ्यात झाड़ पडली, पाणी साचले, ड्रेबिज, साप आला आदी तक्रारी मुख्य कार्यालयामध्ये आल्यावर त्या प्रभागक्षेत्र कार्यालयामधील आपात्कालीन कक्षात कळविले जाते किंवा मुसळधार पावसात प्रभाग क्षेत्र कार्यालय मधून काय काम केले ते वरीष्टाना कळविले जाते. दरम्यान, कल्याण मुख्यालय मधील आपात्कालीन कक्षात 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी पथकाची नेमणुक केली आहे, त्यात दोन पथक प्रमुख 24 तास काम करत आहेत.

दरम्यान मीरा भाईंदर मनपा निवडणूक कामासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या 350 अधिकारी कर्मचारी वर्गाची नेमणुक करण्यात आली असून त्यात आपात्कालीन कक्षात नेमणुक करण्यात आलेल्या अधिकारी वर्गाला निवडणूक काम दिल्याने आपात्कालीन कक्षात ते न फिरकल्याने आज रविवार ता 20 ऑगस्ट रोजी आपात्कालीन कक्ष सुरक्षा रक्षक आणि डायव्हर यांच्या भरोश्यावर सोडण्यात आले होते, कोणी ही फोन उचलत नव्हते न माहिती देत होते, जेव्हा प्रत्यक्ष कार्यालय मध्ये गेल्यावर तेथील कर्मचारी वर्गाने सांगितले की निवडणूक ड्यूटी असल्याने कोणी नाही, न तक्रार नोंद झाली नाही, यामुळे याबाबत पालिका आयुक्त पी वेलरासु यांना फोन केल्यावर पुढील सूत्र हालत दुपारी दोन नंतर पर्यायी अधिकारी देण्यात आला मात्र आपात्कालीन विषयात पालिका किती गंभीर आणि पालिकेचा भोंगळ कारभाराची चर्चा पुन्हा पालिका वर्तुळात रंगली आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :