जगदंबा यात्रोत्सव (बोहाडा) उत्साहात संपन्न

Yatra
Yatra

मोखाडा : मोखाडा तालुक्यात होळी या सणापासुन रंगपंचमी नंतरच्या दोन दिवसापर्यंत समृध्द कलेची पंरपरा असलेला वसंतोत्सव म्हणजे जगदंबा मातेचा बोहाडा उत्सव आठवडा भर चालतो. "बोहाडा" उत्सवाला सर्व समाजातील नागरिक, चाकरमानी मोठ्या श्रध्देने येतात. सुमारे  एक लाखांहुन अधिक भाविकांनी या उत्सवाला हजेरी लावली आहे. 

जगदंबा मातेचा उत्सव होलीका उत्सवापासुन पुढील आठ दिवस रंगपूर्ण व बहारदारपणे साजरा होतो. कागदी लगदा, साग, ऊंबर, प्लायवुड आदी लाकडावर कोरीव काम करुन तयार केलेले देवा दिकांचे मुखवटे सुमारे 300 वर्षांपुर्वीचे असुन दरवर्षी त्यास रंगरंगोटी केली जाते व ही सर्व सोंगे (मुखवटे) तोंडाला लावुन पौराणिक पोषाख आयुधे परिधान करुन वाजंत्रीच्या तालावर लयबध्द नृत्याचा हा उत्सव साजरा केला जातो. या बोहाड्याची सुरवात धुलीवंदनाच्या दिवसापासुन होत असुन यामध्ये गरीब श्रीमंत, जातीभेद, पक्षभेद विसरुन अबालवृध्द या प्रसंगी आपले योगदान देत असतात.पंच्चावन्न ते साठ मुर्तीचा ताफा असलेल्या या मुखवट्यात गणपती, मारुती, नरसिंह, खंडोबा, भैरोबा, महादेव, रक्तादेवी, सुग्रीव, जंबुमाली, हिडींबा, त्राटीका इत्यादी सोंगे तर भीम - बकासुर, राम - लक्ष्मण, याचे मुखवटे नसुन चेहऱ्यावर मेकअप, पोशाख परिधान करुन ही सोंगे नाचवली जातात.

ठराविक घराण्यांकडे दैवतांचे वाटप केले असुन त्या त्या घराण्याने हा वारसा जीवापाड जपण्या बरोबरच परमश्रध्देने अधिकाधिक रंगतदार व समृध्द केला आहे. यामुळे येथील बाेहाड्यास शिस्त, प्रत्येक दैवताचा क्रम, नृत्याचा ठेका, चाल आदी ठरलेले असल्याने गडबड गोंधळ न होता दैवताच्या मिरवणुका ठराविक वेळात संपन्न होतात तर हिडींबाचे लग्न आणि जगदंबा देवीची मिरवणूक येथील उत्सावाचे खास वैशिष्ट्य आहे.

आपले दु:ख व दारिद्र्य याची चिंता न करता आगामी वर्ष आनंदाचे सुख समृध्दीचे जावो म्हणुन तालुक्याचे आराध्य दैवत ग्रामदेवी जगदंबेस साकडे घालुन सप्ताहभर साजरा होणारा हा वसंतोत्सव गावोगावी साजऱ्या होणाऱ्या जत्रांपेक्षा कमालीचा आगळा - वेगळा आहे. यामुळे दिवसा गणिक यात्रोत्सवास येणाऱ्या भाविक भक्तजनांची संख्या वाढती असते.

सद्यस्थितीत ती लाखाच्या घरात पोहचली आहे  जगदंबेचे हे पीठ जागृत असल्याच्या श्रध्देपोटी कितीही दुरगावी असलेला मोखाडा तालुक्यातील रहिवाशी व सर्व धर्मिय माहेरवाशीणी उत्सवाला आवर्जुन हजेरी लावतात यामुळे फाल्गुन वद्य प्रतिपदा ते फाल्गुन वद्य सप्तमी असे सात दिवस मोखाड्यात मोठे धामधुमीचे असतात रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत दैव दैवताच्या मिरवणुका संपल्यानंतर सकाळी ९ वाजता जगदंबा मातेची मिरवणुक काढण्यात आली.  व यानंतर कुसत्यांची विराट दंगल होऊन सप्तमीच्या सात दिवस चालणारा जगदंबा मातेचा यात्रोत्सव (बोहाडा ) संपन्न झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com