डोंबिवलीच्या सांस्कृतिक वैभवात दरवळणार कोकणच्या मातीचा सुगंध

marathi news mumbai creative Bus stop shivsena
marathi news mumbai creative Bus stop shivsena

डोंबिवली - स्वतःची वेगळी सांस्कृतिक ओळख जपून त्यात भर घालण्यासाठी डोंबिवलीकर नेहमीच अग्रेसर असतात. अशीच कल्पकता दाखवून एक नगरसेविका स्वखर्चाने साकारत असलेला बसथांबा सध्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्य करीत असतात. परंतु अशा प्रकारची कामे करतांना कलात्मक दर्जा आणि लक्षवेधी सुबकता दाखवून विकास कामे करणारे फार कमीच असतात. पण औद्योगिक विभागात नगरसेविका प्रमिला मुकेश पाटील यांनी अनोखी पद्धत आणि 'स्व'निधीतून निर्मिती केलेला आकर्षक 'जांभा दगडी बस थांबा' डोंबिवलीकारांचे लक्ष वेधून घेत आहे.

पूर्वेकडील औद्योगिक विभागातील निवासी भाग, एमआयडीसी येथे शिवसेनेच्या नगरसेविका प्रमिला मुकेश पाटील (प्रभाग क्र. ११० सोनारपाडा) यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या बससाठी या आगळ्या-वेगळ्या थांब्याची निर्मिती केली आहे. विषेश म्हणजे बाळासाहेबाच्या जयंतीचे औचित्य साधून त्या बस थांब्याचे लोकार्पण होणार आहे. निवासी भागातून दिवसभर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची लगबग सुरु असते. रिक्षा व परिवहन बसची सोय येथे आहे. परिवहन बसची सोय नियमित आहे. निवासी भागात जेथे सुरवातीचा बसथांबा आहे. जेथून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. तेथे चांगला बस थांबा नव्हता. प्रवाशांना उनौहातच बसची वाटपाहत उभे रहावे लागायचे. सोनारपाड्याचे माजी सरपंच मुकेश पाटील व त्यांच्या पत्नी नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या स्वनिधीतून या अनोख्या आकर्षक कोकणाची आठवण देणाऱ्या बस थांब्याची निर्मिती केली आहे. वैशिष्ठ्य म्हणजे बस थांब्यासाठी दापोली (रत्नागिरी) येथून आणलेला लाल जांभा दगड, उडन लादी, उडन सिलिंग, वेळापत्रका साठी विशेष दिवा, डाव्या-उजव्या बाजूला झाडे आणि कोपऱ्यावर दोन भव्य दिवे असा प्रवाशांचा लक्ष वेधून घेणारा अनोखा बस थांबा अल्पावधीतच साकारला आहे. भविष्यात नि डोंबिवलीकरांचा हा आवडता 'सेल्फी पॉंइंट' होईल असे निदर्शांत येत आहे. कारण संपूर्ण निवासी विभागगातील अबालवृध्द व शाळा कॉलेजचे विद्यार्थी यांची येथे मोठी वर्दळ असते. जांभ्या चिऱ्याचा लाल रंग व खडबडीतपणा कोकणच्या अस्सल रंग-गंधाची आठवण करुन देतो. या थांब्याची रचना देखील एैसपैस आहे. जांभ्यामुळे उन्हाळ्यात कायम थंडावा राहील व प्रवाशांना दिलासा मिळेल. निधीचा खडखडाट असल्याने कल्याण डोंबिवलीत विकासकामे ठप्प आहेत असा टिकेचा सूर आळविणाऱ्या विरोधकांना शिवसेनेने हे करुन दाखविले असे उत्तर दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com