पैसे चोरणाऱ्यास तरुणीने पकडले 

 पैसे चोरणाऱ्यास तरुणीने पकडले 

मुंबई - पैसे बदलून घेण्याचा बहाणा करून 13 हजार रुपये चोरून पळणाऱ्यास तरुणीने पकडले. अंधेरी पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. अन्नू बने सय्यद असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत (ता. 22) पोलिस कोठडी सुनावली. अन्नूचा साथीदार मात्र फरारी झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारदार तरुणी ही अंधेरी पूर्वमध्ये राहते. तिचे ओमनगर परिसरात दुकान आहे. रविवारी (ता. 17) ती दुकानात पैसे मोजत असताना अन्नू आणि त्याचा साथीदार तिथे पोचला. दोघांनी तरुणीला पैसे बदलून देण्याची विनंती केली. पेनाने काहीही लिहिलेल्या नोटा नको, असे आरोपींनी तरुणीला सांगितले. त्यानंतर तरुणी पैसे मोजण्यात व्यस्त असल्याचा फायदा घेत आरोपींनी 13 हजारांची रोकड लांबवून पळ काढला; मात्र तरुणीने आरडाओरड करून आरोपींचा पाठलाग केला. अखेर, अन्नू याला तिने पकडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com