तुर्भे स्थानकात तरुणीचे चुंबन घेणाऱ्याला अटक 

तुर्भे स्थानकात तरुणीचे चुंबन घेणाऱ्याला अटक 

तुर्भे - ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे स्थानकावर गुरुवारी (ता. 22) सकाळी लोकलची वाट पाहणाऱ्या तरुणीला जबरदस्तीने मिठी मारून तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला आरपीएफ पोलिसांनी अटक केली. नरेश कृष्णशंकर जोशी (वय 43) असे त्याचे नाव असून, वाशी रेल्वे पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेचे सीसी टीव्ही छायाचित्रण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महिलावर्गातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकारानंतर लोकल प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

विक्रोळीत राहणारी 21 वर्षीय पीडित तरुणी घणसोलीत एका खासगी कार्यालयात कामाला आहे. आरोपी नरेश जोशी हा घणसोली सेक्‍टर सातमधील सिम्प्लेक्‍स वसाहतीत राहतो. गुरुवारी सकाळी ही तरुणी विक्रोळीतून कामानिमित्त तुर्भे येथे आली होती. सकाळी 11.15 वाजता घणसोलीला जाण्यासाठी फलाट क्रमांक दोनवर लोकलची वाट पाहत उभी होती. त्या वेळी तिच्या पाठीमागून आलेल्या नरेश जोशीने तिला जबरदस्तीने मिठी मारून तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तिने त्याला ढकलत प्रतिकार केला. त्या वेळी आरोपीने पळ काढला. 

दरम्यान, हा प्रकार सीसी टीव्हीत कैद झाला. त्यानुसार आरपीएफ सहायक पोलिस उपनिरीक्षक डी. के. शर्मा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह फलाटावर धाव घेतली. तरुणीने घडला प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी आरोपीला तुर्भे रेल्वेस्थानकाच्या सबवेतून पकडले. त्याची ओळख पटवल्यानंतर आरपीएफ पोलिसांनी त्याला वाशी रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. त्यानुसार त्याला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. न्यायालयाने त्याची रवानगी कोठडीत केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अंगद जाधवर यांनी दिली. 

सहप्रवाशांची असंवेदनशीलता 
तुर्भे स्थानकात घडलेल्या प्रकाराचे सीसी टीव्ही छायाचित्रण गुरुवारी रात्री उशिरा व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. इतर प्रवासी आजूबाजूला असताना आरोपीने सर्वांसमोर पीडित तरुणीला मिठी मारून तिचा विनयभंग केल्याने महिलांतून या घटनेचा संताप व्यक्त होत आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे तुर्भे रेल्वेस्थानकाच्या ज्या फलाटावर हा प्रकार घडला, त्याच ठिकाणी खुर्चीवर तीन प्रवासी बसले होते. त्यांच्या देखत या व्यक्तीने पीडित तरुणीसोबत अश्‍लील चाळे केले. या वेळी पीडित तरुणीने आरडा-ओरड केल्यानंतरही त्या ठिकाणी बसलेले कुणीही प्रवासी पीडित तरुणीच्या मदतीला धाऊन आले नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या असंवेदनशीलतेबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com