मेरे भाई को जन्नत नसीब हुई; मुस्तफा डोसाची बहीण 

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 28 जून 2017

'कोर्ट उसे क्‍या सजा देता, अल्लाहने उसे इन्साफ दिया.. सरकार तो उसे मारनेपर तुली थी' असा आरोप करत ती रुग्णालयाबाहेर आली. या महिलांना नंतर टॅक्‍सीतून घरी पाठविण्यात आले. 

मुंबई : 'सरकार तो उसे मारनेपर तुली थी.. कोर्ट उसे क्‍या सजा देग; अल्लाहने उसे इन्साफ दिया; मेरे भाई को जन्नत नसीब हुई' असा आक्रोश मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी मुस्तफा डोसाच्या नातेवाईकांनी केला. हृदयविकाराच्या झटक्याने डोसाचा आज (मंगळवार) जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. 

छातीत दुखत असल्याची तक्रार डोसा याने केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. मूळ आग्रिपाडा येथील निवासी असलेल्या डोसाच्या मृत्यूची बातमी कळताच त्याचे नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात आले होते. 

93 बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू

'मेरे भाई को जन्नत नसीब हुई' असे म्हणत डोसाच्या बहिणीने अन्य नातेवाईक महिलांना मिठी मारली. 'कोर्ट उसे क्‍या सजा देता, अल्लाहने उसे इन्साफ दिया.. सरकार तो उसे मारनेपर तुली थी' असा आरोप करत ती रुग्णालयाबाहेर आली. या महिलांना नंतर टॅक्‍सीतून घरी पाठविण्यात आले. 

या रुग्णालयाबाहेर अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ, उपायुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा, सहाय्यक आयुक्त पोटे आणि जे. जे. मार्ग पोलिस, डोंगरी पोलिस यांच्यासह अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या
मंजुळा शेट्येंवर पोलिसांनी केला लैंगिक अत्याचार- इंद्राणी मुखर्जी
पाऊस दिंडीत यात्रेकरूंनी केली बियांची पेरणी
'जेएनपीटी'ला रॅन्समवेअर व्हायरसचा फटका
पंढरपूर: गर्भपात करताना पोलिसांनी पकडले
दोन मुलांना जाळून मारणाऱ्या निर्दयी बापास अटक
शिवशाहीर डॉ. तनपुरे यांचा विनामुल्य व्याख्यानाचा निर्धार
मीरा कुमार यांनी दाखल केला अर्ज
बालक पालकमधला अव्या परत येतोय!
लोहगाव विमानतळावरील पार्किंग शुल्क होणार कमी