मुंबई-अहमदाबाद मार्गावर 70 बुलेट ट्रेनच्या फेऱ्या 

मुंबई-अहमदाबाद मार्गावर 70 बुलेट ट्रेनच्या फेऱ्या 

मुंबई - देशातील सर्वांत वेगवान प्रकल्प असलेला बुलेट ट्रेनच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर 35 आणि अहमदाबाद-मुंबई मार्गावर 35 अशा दिवसभरात 70 फेऱ्या दिवसाला असतील. दर अर्ध्या तासाने बुलेट ट्रेनची एक फेरी असेल. वर्दळीच्या वेळी तीन, तर इतर वेळी दोन बुलेट ट्रेन धावतील. 2053 पर्यंत यात वाढ होऊन दिवसाला 105 फेऱ्या सुरू करण्याचे राष्ट्रीय जलदगती रेल निगम लिमिटेडचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रोज सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत बुलेट ट्रेनची सेवा सुरू राहणार आहे. रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत बुलेट ट्रेनची देखभाल करण्यात येणार आहे. आठवड्याचे सात दिवस बुलेट ट्रेन धावेल. मुंबई-अहमदाबाद मार्गासाठी बुलेट ट्रेनची तिकीट हे अंदाजे तीन हजार रुपये असणार आहे. सुरुवातीला मुंबईत बुलेट ट्रेनचे 10 रॅक आणण्यात येणार आहेत, तर भविष्यात याची संख्या 16 रॅकची असणार आहे. पहिल्या वर्षी 30 हजार प्रवासी प्रवास करतील, तर 2053 पर्यंत यात मोठ्या संख्येने वाढ होऊन हा आकडा एक लाख 58 प्रवाशांपर्यंत पोहचेल, असा दावा राष्ट्रीय जलदगती रेल निगम लिमिटेडने केला आहे. मुंबई-अहमदाबाद हा 508.02 किमीचा प्रकल्प असून यात एकूण 12 स्थानकांचा समावेश असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com