ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना या स्पर्धांमुळे संधी: एकनाथ शिंदे

cricket
cricket

डोंबिवली : ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतील त्यासाठी अशा स्पर्धा वारंवार झाल्या पाहिजेत असे विचार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीण आमदार चषक 2018 च्या बक्षीस वितरण समारंभा प्रसंगी मांडले.

ते म्हणाले कि, ग्रामीण भागात असंख्य अष्टपैलू खेळाडू असून त्यांना संधी दिल्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू निर्माण होतील .कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली  शिळ  येथील कोडब मैदानात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्ध्येमध्ये वाकलण संघाने अंतिम विजेते पद पटकावले तर नवापाडा संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले . यावेळी खासदार राजन विचारे, आमदार सुभाष भोईर, आमदार रुपेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, जेष्ठ पत्रकार सोपान बोगाने, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेता संतोष जुवेकर, नगरसेवक संजय भोईर, अमर पाटील, जि. प. सदस्य रमेश पाटील उपस्थित होते. 

आमदार चषक 2018 स्पर्धेत 48 संघांनी प्रवेश घेतला, दररोज 9 सामने खेळविण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक 2लाख 50 हजार व चषक वाकलन संघ, द्वितीय 1लाख 50हजार व चषक नवापाडा, तृतीय 75 हजार व चषक  उत्तरशिव आणि चतुर्थ 50 हजार व चषक मोठागाव  तसेच मॅन ऑफ द सिरीज  चारचाकी गाडी मनोज उर्फ पिंट्या जोशी नवापाडा , उत्कृष्ठ फलंदाज सुरेंद्र लोखंडे नावापाडा  बाईक  व गोलंदाज मोतीराम भोईर वाकलन  बाईक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रतीक मढवी नावापाडा मोबाईल फोन व लकी ड्रॉ म्हणून  बाईक श्रेयश गायकवाड आदी  बक्षिसे देण्यात आली. आमदार चषक 2018 स्पर्धेसाठी अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या .

सदर स्पर्धेचे आयोजन शिवसेना युवासेना तसेच  अलिमकर 11 क्रिकेट क्लब शिळगाव, गावदेवी क्रिकेट क्लब शिळगाव, एस. बी. ग्रुप यांच्या माध्यमातून उत्कृष्ठरित्या करण्यात करण्यात आल्याबद्दल पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांनी युवासेना कळवा - मुंब्रा अधिकारी सुमित सुभाष भोईर व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. 

ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी हक्काचे क्रीडांगण बनवून देणार ग्रामीण भागात अष्टपैलू खेळाडू तयार करण्यासाठी क्रीडांगणाची अत्यंत आवश्यकता असून ठाणे आयुक्तांसोबत चर्चा करून ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना सरावाकरिता हक्काचे क्रीडांगण मिळवून देणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com