खांदेश्‍वरमध्ये फ्लॅट परस्पर दुसऱ्यालाच विकून गंडवले 

 Mumbai News Crime News Fraud Case Flat
Mumbai News Crime News Fraud Case Flat

नवीन पनवेल : मुलांच्या शिक्षणासाठी फ्लॅट विकण्याचा बहाणा करून खरेदीदाराकडून चार लाखांची आगाऊ रक्‍कम घेणाऱ्या एका दाम्पत्याने हा फ्लॅट परस्पर दुसऱ्याच व्यक्तीला विकून मूळ खरेदीदाराची फसवणूक केली. आनंद मागाडे (44) व सविता मागाडे (40) असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी या दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव रवींद्र नागरगोजे (41) असे आहे. खारघर सेक्‍टर-20 परिसरात तो राहत होता. त्यांची फसवणूक करणारे मागाडे दाम्पत्य हे पनवेलच्या आदई गावात राहतात. मागाडे दाम्पत्याने 2014 मध्ये मुलांच्या शिक्षणानिमित्ताने आपला फ्लॅट विकण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी खारघरमधील वकील रवींद्र नागरगोजे यांनी मागाडे यांचा फ्लॅट 20 लाखाला विकत घेण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर नागरगोजे यांनी आगाऊ रक्‍कम म्हणून रोख व चेक स्वरूपात मागाडे दाम्पत्याला 4 लाख रुपये दिले; तसेच उर्वरित रक्कम फ्लॅट नावावर केल्यानंतर देण्याचा व्यवहार त्यांच्यात झाला. 

मागाडे दाम्पत्याने 4 लाखांची रक्कम घेतल्यानंतर ही रक्‍कम स्वत:साठी वापरली; परंतु नागरगोजे यांच्या नावावर फ्लॅट केला नाही. उलट त्यांनी हा फ्लॅट दुसऱ्याच व्यक्तीला विकला. हा प्रकार समजल्यानंतर नागरगोजे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर नागरगोजे यांनी या दाम्पत्याविरोधात खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली; मात्र या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com