संविधान गौरव वक्तृत्व स्पर्धेत महाडचा लक्ष्मण विठ्ठल कचरे प्रथम

mumbai
mumbai

मुंबादेवी : वांद्रे येथील चेतना महाविद्यालयतील डाॅ बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन संविधान गौरव वक्तृत्व स्पर्धेत महाडच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या लक्ष्मण विठ्ठल कचरे याने प्रथम क्रमांक पटकावून प्रा. आनंद देवडेकर पुरस्कृत फिरत्या चषकावर आपले नाव कोरले.

तर दुसरा क्रमांकही महाडच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्याच कु. एकनाथ अंकुश गोपाळ याने पटकावला. तिसरा क्रमांक ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयाची कु. पल्लवी देवीदास मोरे हिने मिळवला तर पार्ल्याच्या साठे महाविद्यालयाचा कु.आनंदराज घाडगे याला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. 

'व्यक्तीस्तोम, लोकशाहीला घातक 'आणि 'धर्मांधता : लोकशाहीपुढील आव्हान ' या विषयांवर झालेल्या या अतिशय चुरशीच्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे डाॅ. बाळासाहेब कांबळे, मुंबई दूरदर्शनचे वरिष्ठ अभियंता श्री. सुनील गोतपागर व चेतना महाविद्यालयाचे, प्रा. एस. डी. गाडे यांनी काम पाहिले. 

विद्यार्थी, प्राध्यापकांच्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन निवृत्त प्राचार्य डाॅ. एस एस पाटील यांनी केले, तर प्राचार्य डाॅ.  महेशचंद्र जोशी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. गजानन डोंगरे यांनी केले,तर सूत्रसंचालन प्रा. कैलाश लांडगे यांनी केले. प्रा. आनंद देवडेकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने समारोप झालेल्या या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन, प्रा. ज्योती पवार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com