घरावर जप्ती आणता काय? सिलिंडरचा स्फोटच करतो

mumbai
mumbai

मुंबई : विक्रोळी परिसरात भरलेल्या सिलिंडरचा स्फोट घडवतो...पेट्रोल ओतून जाळून घेतो...असा बनाव करत तबबल सात तास यंत्रणांना वेठीस धरण्याचा प्रकार आज एका व्यक्तीने कन्नमवार नगरात केला. पतपेढीच्या कर्जाचे हफ्ते भरले नाहीत, म्हणून कर्मचारी जप्तीसाठी आले होते. त्यांना पळवून लावण्यासाठी दीपक शिवलकर याने हे कृत्य केले. पतपेढीचे कर्मचारी निघून जाताच हा नाट्यमय खेळ संपुष्टात आला. 

शिवलकर याने शिवसह्याद्री पतपेढीकडून कर्ज घेतले होते. परंतु,  व्याज फेडण्यास त्याने असमर्थता दर्शविल्यानं न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्या घरावर शुक्रवारी ता. (23) जप्ती आणण्यात येणार होती. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटापर्यन्त शिवलकरचे नाटक सुरू होते. अखेर त्याला घाबरून पतपेढीचे कर्मचारी निघून गेले. त्याने घराला आतमधून टाळे लावून घेतले होते. विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील इमारत क्रमांक ५४ मध्ये (शुक्रवार) प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे या परिसरात बराच वेळ घबराटीचं वातावरण होतं.

कर्जाची वसुली करणारे कर्मचारी कोर्टाच्या आदेशाने शिवलकरच्या घरी जप्तीसाठी आले होते. यावेळी त्याने गॅस सिलेंडरचा स्फोट करेन अशी धमकी देत घाबरवून सोडलं. ‘घर आणि दुकानात हे अधिकारी आणि पोलीस आले तर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट घडवू.’ अशी धमकी दीपक वारंवार देत होता. घरात स्वतःसह पत्नीला कोंडून घेतले. याची माहिती वसुली पथकाने पोलिसांना दिली असता घटनास्थळी पोलीस उपस्थित झाले. पोलिसांनी दिपकला समजावून गॅस सिलेंडर वरून दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तेव्हा त्याने गॅस सिलेंडर ची तोटी बंद केली. त्यानंतर त्याने पेट्रोल ने भरलेली बाटली आणून पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेण्याची  धमकी दिली. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवलकरची बरीच समजूतही काढण्यात आली. शिव सह्यादी पतपेढी कडून शिवलकर यांनी 2005 साली 12.5 लाखाचे कर्ज घेतले होते. हफ्ते न भरल्याने कर्जाची रक्कम 30 लाख रुपये झाली आहे. शिवलकर ऐकत नसल्याने पोलीस प्रशासनाने अग्निशमन दलाला पाचारण केले. 108 च्या रुग्णवाहिका ही बोलवण्यात आली. तरीही कारवाई करण्यास गेल्यास शिवलकरने काही करून घेतलं तर या भितीमुळे दरवाजा तोडला नाही. 

बघ्यांची गर्दी
या प्रकरणामुळे नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. इमारतील रहिवाशीही घाबरले होते. अखेर पोलिसांनी जमलेली गर्दी पांगवली.

आज ची कारवाई जरी टळली असली तरी पुन्हा  या घरावर नवीन आदेश काढून जप्ती करण्यात येईल.
- युवराज मुळके, विशेष कर्जवसुली व विक्री अधिकारी, बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन

तर या बाबत कायदे विभागाशी चर्चा करून आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन जी कायदेशीर कारवाई शक्य आहे ती करणार. 
- संजय मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रोळी पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com