अन् मोहिते महाविद्यालय झाले सैराटमय 

Mumbai News Mohite College Sairat Film
Mumbai News Mohite College Sairat Film

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील मुरलीधर नानाजी मोहिते महाविद्यालय आणि यशोदाबाई मोहिते कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम 'सैराट' चित्रपट फेम सुरेश विश्वकर्मा  (तात्यासाहेब) यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यामुळे महाविद्यालयाचे सर्व वातावरण सैराटमय झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश जोशी, कथा, पटकथा लेखक पुनित शर्मा, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर झिंग-झिंग-झिंगाट गाण्याने दणाणून गेला होता. मोखाड्यातील खोडाळा येथील मुरलीधर नानाजी मोहिते महाविद्यालय आणि यशोदाबाई मोहिते कनिष्ठ महाविद्यालयाने शैक्षणिक वर्षांत विविध उपक्रम राबविले आहेत. त्याचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास सैराट चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारलेले तात्यासाहेब पाटील म्हणजे सुरेश विश्वकर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके, प्रशिस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

सुरेश विश्वकर्मा महाविद्यालयाच्या आवारात येताच विद्यार्थ्यांनी झिंग-झिंग-झिंगाटचा जल्लोष केला. लाऊड स्पीकरवरून सैराटच्या गाण्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी महाविद्यालयाचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. चंद्रमणी मोहिते यांनी सुरेश विश्वकर्मा यांचे स्वागत केले.

चंद्रमणी मोहिते यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचे प्रास्तविक केले आहे. दरम्यान, सुरेश विश्वकर्मा यांनी आपण गरिब कुटुंबातील सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगत शिक्षण घेतले. त्यातच सैराट चित्रपटापर्यंतचा आपला जीवनप्रवास त्यांनी विद्यार्थ्यांपुढे उलगडला आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासात कठोर परिश्रम घ्यावे, असेही ते म्हणाले. 

कार्यक्रमास खोडाळा गावातील डाॅ. मिलिंद कडव, उपसरपंच मनोज कदम यांसह व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. 

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. बी. गवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव प्रा. दीपक कडलग, नवनाथ शिंगवे, प्रवर्तन काशिद, अजय अंधेरे, तुकाराम रोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com