8 महिन्याच्या गर्भवती पत्नीची पतीकडून हत्या

murder.
murder.

वज्रेश्वरी (भिवंडी)- गरोदरपणातही दारू व सिगारेट पिण्यासाठी पतीकडे सतत तगादा लावणाऱ्या पत्नीची पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना भिवंडी तालुक्यातील अनगांव येथे उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपी पतीने घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात तिचा मृतदेह पुरला होता. कल्पेश सुदाम ठाकरे (वय २६ रा. अनगांव) असे आरोपीचे नाव आहे. तर माई उर्फ मनिषा (२३) असे मृत पत्नीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश ठाकरे याचा मनिषा हिच्याशी १० मार्च २०१६ रोजी प्रेमविवाह झाला होता. मनिषा ही व्यवसायाने बारबाला असल्याने तिला लग्नापूर्वीच दारू व सिगारेट पिण्याचे व्यसन होते. ती ज्या बारमध्ये बारबाला म्हणून काम करायची त्या बारमध्ये आरोपी कल्पेश हा मित्रांसोबत मद्यपान करण्यासाठी जात असे त्याच ठिकाणी त्यांची ओळख झाली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले होते. या दोघांनी बांद्रा येथे विवाह कार्यालयात नोंदणी पद्धतीने लग्न केले. मात्र ऐषआरामाची सवय असलेल्या मनिषाचे सासरच्या मंडळींशी जमत नसल्याने हे दोघेही वर्षभरापासून अंबाडी येथे राहत होते. 

मनिषा आठ महिन्यांची गरोदर असल्याने आपले बाळ जन्माला येईल या खुशीने आरोपी कल्पेश आनंदित होता. पत्नी मनिषाने दारू व सिगारेटच व्यसन सोडावे यासाठी कल्पेश तिला रोज समजावत होता. मात्र ती गरोदर असतानाही पती कल्पेशकडे दारू, सिगारेटच्या व्यसनासाठी मागणी करायची. यामुळे आपल्या होणाऱ्या बाळावर या व्यसनाचा दुष्परिणाम होईल असे तिला आरोपी कल्पेश वांरवार सांगत होता. यावरून दोघामध्ये भांडणेही व्हायची. अखेर रोजच्या त्रासाला कंटाळून कल्पेश याने 9 मार्चच्या रात्री पत्नी माही हिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर एक रात्र मृतदेह घरात ठेवून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह अनगांव येथील घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात पुरला.

त्यानंतर पोलिस व मनिषाच्या कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी कल्पेश याने शक्कल लावून पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार १२ मार्चला गणेशपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने 8 महिन्याची गरोदर असलेल्या मनिषाचा शोध पोलिस घेत होते. आरोपी कल्पेश हा पोलिस ठाण्यात वारंवार जावून बेपत्ता पत्नीची चौकशी करीत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. यावेळी पोलिसांनी मनिषाच्या आईवडिलांशी संपर्क केला असता तिचा मोबाईल ९ मार्चपासूनच बंद येत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी कल्पेश याला ताब्यात घेवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानेच पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात पुरल्याची कबुली दिली.

दरम्यान, गणेशपुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर डोंबे, पोलिस उपनिरिक्षक विशाल वायकर, नायब तहसीलदार संदीप आवारी, स्व. इंदिरा गांधी हॉस्पिटलचे डॉ. आरिफ शेख आदींचे पथक घटनास्थळी दाखल होवून पुरलेले प्रेत बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी पती कल्पेशला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com