राणेंच्या भाजप प्रवेशाची शिवसेनेला धास्ती 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 ऑगस्ट 2017

मुंबई : कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांच्याबरोबर मुंबईतील नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास कॉंग्रेसपेक्षा शिवसेनेला जास्त धोका आहे. राणे यांच्याबरोबरच दहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास महापौर पदापासून सर्वच समित्या भाजपच्या ताब्यात जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.25) रात्री राणे यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल असल्याचे मानले जात आहे. 

राणे भाजपमध्ये गेल्यास मुंबई महापालिकेतील त्या पक्षाची ताकद वाढण्याची शक्‍यता आहे. नायगाव येथील सुप्रिया मोरे आणि गोवंडी येथील विठ्ठल लोकरे हे कॉंग्रेसमधील राणे समर्थक नगरसेवक मानले जातात. तर इतर सहा नगरसेवक राणे यांच्या संपर्कात असल्याचे मानले जाते. 

राणे यांच्याबरोबरच दहा ते बारा नगरसेवक भाजपमध्ये गेल्यास त्यांना पुन्हा निवडणूक लढवून जिंकून यावे लागेल. त्यापैकी निम्मे नगरसेवक निवडून आले तरी शिवसेनेची पाचावर धारण बसू शकते. शिवसेना आणि भाजपच्या संख्याबळात अवघ्या चार नगरसेवकांचा फरक आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधून आलेले सहा नगरसेवक निवडून आले तरी शिवसेनेच्या सत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. 

महापौरांविरोधात अविश्‍वास 
भाजपचे संख्याबळ शिवसेनेपेक्षा जास्त झाल्यास महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणून फेरनिवडणूक घ्यावी लागेल. मात्र, यात मनसेच्या नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. मनसेचे सात नगरसेवक आहेत. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यास भाजपचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंग पावू शकते. कॉंग्रेसही आयत्यावेळी शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो. मात्र, समित्यांमध्ये भाजपचे संख्याबळ वाढणार असल्याने स्थायीसह सर्व समित्या त्या पक्षाच्या ताब्यात येण्यात कोणतीही अडचण नाही. 

संख्याबळ 

  • शिवसेना (अपक्षांसह) : 88 
  • भाजप (अपक्षांसह) : 84 

पक्षांतर बंदीमुळे अडचणी 
महापालिकेत कॉंग्रेसचे 30 नगरसेवक आहेत. त्यामुळे 20 नगरसेवकांनी कॉंग्रेसपासून वेगळे होऊन स्वत:चा गट स्थापन केल्यास त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होण्याची शक्‍यता नाही. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक फुटण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे राणे यांच्यासोबत जाणाऱ्या नगरसेवकांना फेर निवडणुकीला समोरे जावे लागेल, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

Web Title: marathi news mumbai news Narayan Rane Shiv Sena Congress Uddhav Thackray Devendra Fadnavis BJP