विक्रोलीयन्स संघाने जिंकली रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2018

Vikrolians
Vikrolians

विक्रोळी (मुंबई) : रत्नागिरी जिल्ह्यातील मानाची मानली जाणारी साई स्पोर्ट्सच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 वर विक्रोळी येथील विक्रोळीयन्स संघाचे नाव कोरले गेले. विक्रोळीयन्स हा संघ विक्रोळीतील नावाजलेला क्रिकेट संघ आहे. या आधी या संघाने प्रहार चषक आपले नाव कोरले होते तसेच सुप्रीमो चषकामध्ये उपविजेतेपद पटकावले होते.

अटीतटीच्या लढतीत विक्रोळीयन्सनी हातखंबा वॉरियर्सवर शनिवारी ता. (10) 7 गडी राखून विजय मिळवला. या अंतिम सामन्यासाठी क्रीडा प्रेमींनी छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर मोठी गर्दी केली होती. विजेत्यांचा सत्कार माजी क्रीडा राज्य मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

क्रिकेट हा खेळ लहानापासून वृद्धापर्यंत सर्वांच्या आवडीचा आहे. आंतरराष्ट्रीय सामने आपल्याला पाहायला मिळावेत ही प्रत्येक क्रीडा प्रेमींची इच्छा असते. मात्र ते प्रत्येकाला शक्य नसते. या ट्रॉफीवर विक्रोळीयन्स या संघाने आपले नाव कोरले. शनिवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सोहळ्यात विक्रोळीयन्स संघाने हातखंबा वॉरियर्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. विक्रोळीयन्सनी नाणेफेक जिंकत त्यांचे हुकमी क्षेत्ररक्षण निवडले आणि हातखंबाला फलंदाजीची संधी दिली. हातखंबाच्या संघाने नंदकुमार उपळे 29 (18), आप्पा काशीद 16 (19) आणि समीर पवार यांच्या 11 (5) धवांच्या जोरावर 5 बाद 74 इतका धावांचा डोंगर रचत विक्रोळीयन्स संघाने आव्हान दिले.  

8 षटकांच्या अंतिम सामन्यात विक्रोळीयन्स हे लक्ष्य कसे गाठते याकडे सर्व उपस्थिताचे लक्ष लागून राहिले होते. चेंडू गणिक चित्र बदलत होते. मात्र एक चौकार आणि 3 षटकारांच्या साहाय्याने 9 चेंडूत विनय सिंगच्या 26 धावा, 12 चेंडूतील मंगेश वैत्यच्या 19 धावा आणि निशांत शिवलकरच्या 12 चेंडूतील 17 धावांमुळे विक्रोळीयन्सनी आठव्या षटकात 5 चेंडू आणि 7 गडी राखून हा सामना आपल्या खिशात घातला आणि विक्रोळीयन्स 2018 चे रत्नागिरी चॅम्पियन्स ठरले.

अंतिम सामान्या आधी हातखंबा वॉरियर्स आणि वाय सी सी पावस यांच्यामध्ये पहिला आणि साईरत्न व विक्रोळीयन्स यांच्यात दुसरा उपांत्य फेरीतील सामना रंगला. उपांत्य फेरीत विक्रोळीयन्स आणि साईरत्न यांच्यात अंतिम फेरीसाठी झुंज रंगली. साईरत्न संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणासाठी संघ मैदानात उतरला. विक्रोळीयन्सचा फलंदाजीचा हुकमी एक्का असलेल्या शशिकांत कदम याने काढलेल्या 34 धावा आणि मंगेश वैत्यच्या 16 धावांमुळे संघाची धावसंख्या 1 बळी गमावून 59 झाली. 60 धावांचे लक्ष्य गाठताना साईरत्नचा संघ एककपाठोपाठ एक कोसळत गेला.

किसन देवेंद्र (18), ओंकार देसाई (12) आणि ऋषी देसाई (8) यांनी झुंज निरुपयोगी ठरली. विक्रोळीयन्स चा गोलंदाज गिरीश कोचरेकर (2) आणि राहुल वराडकर (2) यांच्या गोलंदाजीचा सामना साईरत्न करू शकला नाही आणि 8 गडी गमावून 53 धवांपर्यंत पोहोचला. अटीतटीच्या या लढतीत विक्रोळीयन्स नि 7 धावांनी सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि तिथे विजयी चषकावर आपले नाव कोरले.
यामध्ये राजेश सोरटे मालिकवीर ठरला तर शशिकांत कदम उत्कृष्ट फलंदाज, गिरीश कोचरेकर याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी आ.उदय सामंत यांचा सह नगराध्यक्ष राहुल पंडित, उद्योजक अण्णा सामंत, किरण सामंत, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप, माजी उपनगराध्यक्ष संजय साळवी, प्रशांत साळुंखे, नागरसेवकर, शिवसेना पदाधिकारी, ओम साई स्पोर्ट्सचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

ही ट्रॉफी जिंकून खूप छान वाटत आहे. आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूने अप्रतिम खेळ केल्यामुळे आम्ही हा चषक जिंकू शकलो. क्रिकेट हा खेळ सर्वांच्या आवडीचा खेळ आहे. टेनिस क्रिकेटमध्येही युवपिढीला भवितव्य घडवण्यासाठी संधी आहे, असे मत विक्रोलियन्स संघाचा कर्णधार अमोल म्हात्रे याने व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com