सफाळ्यात माकपचे आंदोलन ; चार तरुणांना अटक केल्याने आदिवासी संतप्त

 Mumbai News Safale News MCP Tribal Community Agitation Four Youth Arrested
Mumbai News Safale News MCP Tribal Community Agitation Four Youth Arrested

सफाळे : सफाळे वनक्षेत्र परिसरातील राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण करून झाडांची नासधूस केल्यामुळे केळवे रोड (दंडपाडा) येथील चार आदिवासी तरुणांना सफाळे वनक्षेत्रपालांनी अटक केली. याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्रभर वन विभाग कार्यालयाला घेराव घातला. तसेच वनपाल पी. एन. म्हसकरे यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाईची मागणी केली. 

सफाळे वनक्षेत्र परिसरातील केळवे रोड येथील दंडपाड्यातील 110 क्रमांकाच्या गटामध्ये काहींनी वनजमीन खोदली. त्यानंतर जमिनीवर बांध घालून अतिक्रमण केले. तसेच छोटी झाडे तोडल्याची माहिती सफाळे विभागाच्या वनक्षेत्रपाल रुचिता संखे, म्हसकरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी जाऊन सुभाष बच्चू किरमिरे, हितेश वसंत किरमिरे, मगन धर्मा वरठा, गौतम सुरेश गरेल यांना अटक केली.

त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे कळल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कॉ. हीना वनगा, सुदाम धिंडा, सुनील सुर्वे, बबलू त्रिवेदी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी सफाळे वन विभागाच्या कार्यालयाला घेराव घातला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com