शिवाजी महाराजांसारखा दिसणारा पुतळा नेमका कुणाचा?

Ulhasnagar
Ulhasnagar

उल्हासनगर : पालिकेच्या अधिकृत आणि खाजगी पुतळ्यांच्या यादीत नोंदच नाही, असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा दिसणारा पुतळा उल्हासनगरातील एका भागात अडगळीच्या ठिकाणी आहे. मात्र हा पुतळा महाराजांचा नसून तो कुणाचा?असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

उल्हासनगरात कॅम्प नंबर 5 मधील गांधी चौकाच्या परिसरात हा पुतळा असून हा पुतळा दुरावस्थेच्या विळख्यात सापडलेला आहे. या पुतळ्याची उभारणी सिमेंट-चुना मिश्रित करण्यात आली असून जर्जर झाल्याने पुतळ्याचे दोन्ही हातांना भेगा पडलेल्या दिसत आहेत.हात कधीही निखळून पडतील अशी परिस्थिती या पुतळ्याची झालेली आहे.

संपूर्ण शहरात उल्हासनगर महानगरपालिके मार्फत 23 महापुरुष व संतांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे दोन अर्धा पूर्णाकृती पुतळे अनुक्रमे महापालिका व कॅम्प नंबर 3 मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहेत. याव्यतिरिक्त महाराजांचा पुतळा अन्यत्र कुठेही नाही. मात्र गांधी चौक परिसरातील या पुतळ्याची निर्मिती जवळपास शिवाजी महाराज यांच्या सारखी करण्यात आल्याने, मात्र ते महाराज नसल्याने ते नेमके कोण? हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

1970 च्या दशकातील पुतळा
याबाबत स्थानिक रहिवासी केस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सर्वेसर्वा राजा गेमनानी यांच्याशी विचारणा केली असता, भारत पाकिस्तान अशी फाळणी झाल्यावर पाकिस्तानातून उल्हासनगरात आलेले काँग्रेसचे खिलनमल बसंतानी यांनी 1970 च्या दशकात हा पुतळा उभारला होता. या पुतळ्याच्या समोरच बसंतानी राहत होते. मात्र हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही. या पुतळ्यात हातात जी तलवार आहे ती खाली असून छत्रपतींच्या हातातील तलवार वर असते. हा पुतळा पाकिस्तानातील एखाद्या सिंधी राजाचा असावा पण त्यांचे नाव काय? हे कुणालाही ठाऊक नाही.पण हा पुतळा महाराजांसारखा दिसत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी काही तरुण जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा देत पुतळ्याला वर्षातून एकदा हार अर्पित करतात. असे राजा गेमनानी यांनी सांगितले.

पालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याशी या पुतळ्या विषयी संपर्क साधला असता, पालिकेच्या व खाजगी संस्थांच्या यादीतच नसलेला हा पुतळा नेमका कुणाचा? हे बघण्यासाठी गांधी चौक गाठणार व पुढील निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया दैनिक सकाळशी बोलताना व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com