खेळपट्टीवर पिण्याचे पाणी फवारत नसल्याचे एमसीएचे स्पष्टीकरण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

मुंबई : दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर फवारण्यासाठी मुंबई महापालिका किंवा अन्य कोणत्याही खासगी संस्थेमार्फत आलेले पिण्याचे पाणी वापरले जात नाही, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

आयपीएल क्रिकेट सामन्यांसंबंधी लोकसत्ता मूव्हमेंट या सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर नुकतीच न्या. अभय ओक आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

स्टेडियम व्यवस्थापन पावसाच्या पाण्याचे नियमन करते. त्याचा वापर खेळपट्टीसाठी केला जातो. मैदानाशेजारच्या विहिरींमधील पाणीही त्यासाठी वापरले जाते. दररोज साधारणतः 30 हजार लिटर पाणी वापरले जाते, असे असोसिएशनच्या वतीने ऍड. ए. एस. खांदेपारकर यांनी सांगितले.

भविष्यातही अशाच प्रकारची तरतूद मैदानासाठी करणार का, अशी विचारणा न्यायालयाने केली; मात्र याबाबत काही भाष्य करण्यास खांदेपारकर यांनी असमर्थता दर्शवली.

याचिकेवर आता 28 फेब्रुवारीला सुनावणी होईल. त्याच दिवशी याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. दुष्काळी परिस्थितीत मैदानांसाठी अशाप्रकारे पाण्याची उधळपट्टी करण्यास मनाई करावी, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे.  

मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news mumbai news Wankhede Stadium IPL Matches Mumbai High Court