रेल्वेलगतच्या झोपड्यांच्या पाडकामास सुरुवात 

रेल्वेलगतच्या झोपड्यांच्या पाडकामास सुरुवात 

मुंबई  - पश्‍चिम रेल्वे मार्गावर बोरिवली येथील रेल्वेरुळालगत असलेल्या जागेत रेल्वेची विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी रेल्वेकडून रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवून भूसंपादन प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. पश्‍चिम रेल्वेने बोरिवली व दहिसर येथील रेल्वेच्या हद्दीत वसलेल्या झोपडपट्टीधारकांवर शुक्रवारी तोडक कारवाईची मोहीम हाती घेतली. या कारवाईला उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी विरोध दर्शवला आहे. प्रथम झोपडीधारकांचे पुनर्वसन करा, या मागणीसाठी खासदार शेट्टी यांनी पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत धरणे आंदोलन केले. 

शुक्रवारी सकाळी पश्‍चिम रेल्वेने दहिसर येथील रेल्वे रुळाशेजारील रेल्वेच्या हद्दीत वसलेल्या झोपड्या पाडण्यास सुरुवात केली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह 288 झोपड्या जमीनदोस्त केल्या. 

सरकारने 2011 पर्यंतच्या झोपड्या नियमित केल्या आहेत. असे असताना या झोपडीधारकांना पर्यायी घर न देता केलेली कारवाई अयोग्य असल्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी रेल्वेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

आम्ही गेली 25 वर्षे त्या ठिकाणी राहतोय. रेल्वेने इतर ठिकाणी असलेल्या झोपडीधारकांना पर्यायी घरे दिली, त्याप्रमाणे आमचेही पुनर्वसन करावे. 
- शबाना पठाण, स्थानिक झोपडीवासी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com