मृत राहुल कुंचिकरवेच्या आईला शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मदत

Dharavi
Dharavi

धारावी : आर. पी. नगर, लेबर कॅम्प येथील राहुल दुर्गाप्पा कुंचिकरवे (वय 20) याचा दत्तक योजनेचे साफसफाईचे काम करत असताना विजेचा धक्का लागून काल (ता. 11) मृत्यू झाला होता. शिवसेनेच उपविभागप्रमुख मुत्तु तेवर यांनी दत्तक योजना चालवणाऱ्या संस्थेला जबाबदार धरून त्यांनी मदत करावी अशी मागणी केल्यामुळे मुलाची आई कमला यांना चार लाखाची मदत मिळाली. राहुल हा घरात एकटाच कमावणारा होता. यावेळी नगरसेविका मारीअम्मल मुत्तु तेवर उपशाखाप्रमुख गंगा देरबेर, संस्थाप्रमुख आणि इतर रहिवाशी उपस्थितीत होते यावेळी स्थानिक रहिवाशांनी शिवसेना शाखा क्र. 189 चे उपशाखाप्रमुख गंगा देरबेर यांच्या प्रयत्नामुळे मदत मिळाली यामुळे शिवसेनेचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com