'...मोदींच्या मयताला' घोषणेने भाजप संतप्त

मिलिंद तांबे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

अच्छे दिन नकोत; किमान पहिले बुरे दिन तरी परत द्या, अशा लोकांच्या भावना बनल्या आहेत. नोटाबंदी, कॅशलेस हे निर्णय फसले आहेत. मोठे मोठे होर्डिंग लावून भाजपच्या नेत्यांनी आश्वासने दिली. हे नेते आता कुठे आहेत.

- युवा नेते आदित्य ठाकरे

 

महागाईविरोधात शिवसेनेने आजपासून सुरू केलेल्या आंदोलनाचे टार्गेट भाजप आहे. मुंबईतील आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शिवसैनिकांनी घोषणांमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. 

पंतप्रधानांच्या मृत्यूच्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. 'एवढी माणसं कशाला मोदींच्या मयताला' ही घोषणा भाजपच्या जिव्हारी लागली आहे. भाजपच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तत्काळ या घोषणेला प्रत्युत्तर दिले आहे. 

महागाईविरोधात आंदोलनाची घोषणा शिवसेनेने केली असून मुंबईत अकरा ठिकाणी आंदोलन सुरू आहे. 

आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना युवा नेते आदित्य ठाकरे म्हणाले, अच्छे दिन नकोत; किमान पहिले बुरे दिन तरी परत द्या, अशा लोकांच्या भावना बनल्या आहेत. नोटाबंदी, कॅशलेस हे निर्णय फसले आहेत. मोठे मोठे होर्डिंग लावून भाजपच्या नेत्यांनी आश्वासने दिली. हे नेते आता कुठे आहेत?

भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप करून आदित्य म्हणाले, की सत्तेत असलो, तरी अंतिम निर्णय उद्धव साहेब लवकरच घेतील. आम्ही रेडिओवर नाही, तर लोकांच्या मन की बात एेकतो. 

(मिलिंद तांबे हे साम टीव्ही मराठीचे बातमीदार आहेत.)