दुर्मिळ खवले मांजर ठाण्यात हस्तगत 

दुर्मिळ खवले मांजर ठाण्यात हस्तगत 

ठाणे - दुर्मिळ असलेले खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठाणे गुन्हे शाखा परिमंडळ पाचच्या पथकाने अटक केली आहे. अशोक जाधव (29, रा. रायगड) आणि संतोष बुटाला (रा. पोलादपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून जिवंत खवले मांजर आणि जीप जप्त केली. 

या खवले मांजराची किंमत 40 लाख आहे. या खवले मांजराला वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. 

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील श्रीनगर येथे दोघे जण तोंडात एकही दात नसलेला व मुंग्या आणि अळ्या खाऊन जगणारा दुर्मिळ सस्तन प्राणी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून जाधव आणि बुटाला यांना खवले मांजरासह अटक करण्यात आली. कर्करोगासारख्या आजारावर खवल्यांपासून तयार केलल्या औषधाचा वापर केला जातो, असा समज आहे. या चोरांनी कोणासाठी या वन्यप्राण्याची तस्करी केली याचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com