टिटवाळा रेल्वेस्थानकात घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाश्यांचे आरोग्य धोक्यात

kalyan-railway-station
kalyan-railway-station

कल्याण : रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अनेक घोषणा करण्यात येतात मात्र त्याची टिटवाळा रेल्वे स्थानकात अंमलबजावणी करण्यात येत नाही. टिटवाळा रेल्वे स्थानकातील दुरावस्था आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रेल्वे प्रवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यावर त्वरीत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने आज शुक्रवारी (ता. 24) रोजी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. 

कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर टिटवाळा रेल्वे स्थानक महत्वाचे आहे. प्रतिदिन येथून अंदाजे 75 हजार प्रवासी प्रवास करतात व येथून रेल्वेला महिन्याला जवळपास सरासरी दिड कोटी उपन्न मिळते. स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रेल्वे मंत्रालयाने कोट्यावधी रुपये खर्च करत उपक्रम जाहीर केला होता, मात्र टिटवाळा रेल्वे स्थानकात अंमलबजावणी न केल्याने प्रवासी वर्गाला चांगलाच त्रास होत आहे. 

प्रवासी वर्गाकडून टिटवाळा रेल्वे स्थानकातील समस्यांबाबत होणाऱ्या तक्रारी पाहता आज शुक्रवार (ता 24) रोजी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाचे अध्यक्ष राजेश घनघाव, श्याम उबाळे, विजय देशेकर, विवेकानंद कानेटकर व दिलीप राठोड आदींच्या शिष्टमंडळाने टिटवाळा रेल्वे स्थानक प्रभारी ए. पी. मेहता यांची भेट घेत समस्यांवर  चर्चा करत निवेदन दिले. यावेळी प्रभारी स्टेशन मास्तर ए. पी. मेहता यांनी वरीष्ठ अधिकारी वर्गाला या समस्येबाबत कळवू असे आश्वासन दिले.

संघटनेच्या मागण्या -

1) रेल्वे स्थानकातील अरूंद पादचारी पूल मोडकळीस आला असून तो दुरुस्त करावा. 

2) रेल्वे स्थानक आणि परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. 
3) रेल्वे स्थानक परीसर आणि स्थानकातील फलाटावर फेरीवाल्यांविरोधात कारवाई करावी.
4) टिटवाळा गणेश मंदीर महागणपती देवस्थान असल्याने लाखो भाविक येतात त्यांना रेल्वे स्थानकामधून बाहेर पडताना तारेवरची कसरत करावी लागते, तर पालिकेच्या मदतीने पार्कींग झोन करावे आणि रिक्षा, टांगे यांच्या रांगा ही निर्माण कराव्या. 
5) टिटवाळा रेल्वे स्थानकात वेळोवेळी लोकल असो, मेल गाड्या येणार असतील तेव्हा सूचना द्याव्यात.
6) रेल्वे फाटकावर पूल नसल्याने वाहन येणे जाणे वाढले असून, त्यामुळे लोकल आणि मेल गाडीचे वेळापत्रक नेहमीच कोलमडते यामुळे त्वरीत पूल बांधण्यात यावा.
7) रेल्वे स्थानकात शौचालयाची व्यवस्था आणि आता जे आहेत त्यांची दुरुस्ती आणि स्वच्छता करावी 
8) स्वच्छता कर्मचारी, प्रवासी वर्गाच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि सुरक्षा बलाची संख्या वाढवावी.
9) रेल्वे ओलांडून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गावर कडक कारवाई करावी. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com