उल्हासनगर हॉर्नमुक्ततेसाठी नागरिक एकवटवले

ulhasnagar
ulhasnagar

उल्हासनगर : ध्वनि प्रदूषणाच्या विरोधात शहराला हॉर्नमुक्त करण्यासाठी कंबर कसणारे पोलीस उपायुक्त अंकित गोयल व हिराली फाऊंडेशनचे पुरुषोत्तम खानचंदानी, सरिता खानचंदानी या दाम्पत्याने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात एकवटलेल्या उल्हासनगरकरांनी शहराला हॉर्नमुक्त करण्याची शपथ घेतली आहे. शपथग्रहणाचा ऐतिहासिक सोहळा बाळासाहेब ठाकरे क्रिडा संकुलात पार पडला आहे. त्यात सुमारे तीन हजार विद्यार्थी व पाचशेच्या आसपास पोलीस-शिक्षक सहभागी झाले असून हे शपथग्रहण लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होण्याची शक्यता आहे.

जिथे गरज आहे तिथेच हॉर्न वाजवून रस्त्यांच्या मधोमध चालणाऱ्या नागरिकांना सावध करणे गरजेचे आहे. मात्र रस्ते खाली असताना विशेषतः दुचाकीस्वार मोठमोठ्याने हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करतात. त्याचा परिणाम नागरिकांच्या कानांवर पडतो. दुर्दैवाने एवढ्या मोठ्या प्रमाणात जनजागृती शासनाच्या-पालिकेच्या-पोलिसांच्या वतीने केली जात असतानाही वाहनचालक रुग्णालये-शाळांच्या परीसरात कर्कश्श आवाजाचे हॉर्न वाजवतात. हा प्रकार शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक असून अनावश्यक हॉर्नच्या आवाजाचा मारा टाळणे आणि नागरिकांचे आरोग्य जपणे हिच काळाची गरज असल्याचा संदेश शपथग्रहण वेळी देण्यात आला.

 पोलीस उपायुक्त अंकित गोयल, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील, प्रदीप गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस, सुरेंद्र शिरसाट, दत्तात्रय पालवे, घनश्याम पलंगे, राजभोज, जितेंद्र आगरकर, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल सोनवणे, शरद शिंदे, पोलीस उपायुक्त स्कॉड मधील उपनिरीक्षक दिनेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते पी. एस. आहुजा, शशिकांत दायमा, अनुष्का शर्मा, हरी चावला, मुकेश माखीजा आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. हा सोहळा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने सोहळ्याला अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाट यांनी परिश्रम घेतले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com