केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने केली गिरगाव चौपाटी स्वच्छ

Marathi News_Mumbai_Central Industrial Security Force_Swachha Bharat Abhiyaan
Marathi News_Mumbai_Central Industrial Security Force_Swachha Bharat Abhiyaan

मुंबादेवी - आज रविवारी (ता. 10) सकाळी दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान मोहीमेस केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने प्रारंभ केला.

भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या विविध संस्था, विमानतळे, बीएआरसी, कारखाने, जहाज पोर्ट, माझगाव डॉक सारख्या अत्यंत महत्वाच्या विभागांची सुरक्षा करणारे सशस्त्र दल असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे मुंबई विभागीय महासंचालक सतीश खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विभागाचे एआयजी हिमांशू पांडे, अमित शर्मा, शिप्रा श्रीवास्तव यांच्यासह 250 जवान व त्यांच्या कुटूंबियांनी सकाळी 8:30 ते 11:00 दरम्यान स्वच्छता मोहीम राबवित चौपाटीवरील कचरा गोळा केला. पांढरे शुभ्र गणवेशधारी जवान आज हातात रायफल, स्टेनगन ऐवजी झाडू, फावडे, लोखंडी पंजे, काळ्या पिशव्या घेत कचरा गोळा करताना दिसत होते. त्यांनी जवळपास 100 ते 110 पिशव्या भरून कचरा गोळा केला. हा ओला कचरा भरलेल्या पिशव्या पाण्यातून बाहेर ओढत आणताना अधिकारी वर्ग आणि जवानांची चांगलीच दमछाक झाली. या मोहीमेत एकजा व तनिष्का या एनजीओच्या सदस्यांनी सहभाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com