मुरबाड पोलिसांची धडक कारवाई

Marathi News_The MURABAD police station has started striking action to clear the elections
Marathi News_The MURABAD police station has started striking action to clear the elections

सरळगांव - मुरबाड तालुक्यात 13 डिसेंबर रोजी होणा-या निवडणूका सुरळीत पार पडाव्यात यासाठी मुरबाड पोलिस ठाण्याच्या वतीने धडक कारवाई सुरु केली आहे. निवडणूक काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून 200 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्याची माहिती मुरबाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अजय वसावे यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका 13 डिसेंबर तर मतमोजणी 14 डिसेंबर रोजी होणार असल्याने महसूल खात्याची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 8 जागेसाठी तर पंचायत समितीच्या 16 जागेसाठी एकूण 63 उमेदवार रिंगणात आहेत.   

तालुक्यात या निवडणूक दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून 1 डी वाय एस पी, 1 पी आय, 280 पोलिस कर्मचारी, 18 दुय्यम अधिकारी, 90 होमगार्ड असा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. या काळात अचार संहितेचा भंग करणा-याची व कायदा सुव्यवस्था बिघडविणा-या व्यक्तींची गय न करता त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरिक्षक अजय वसावे यांनी दिला आहे. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून कलम 149, कलम 150 प्रमाणे 200 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. 13 डिसेंबर रोजी मतदान तर 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com