मराठी विश्‍वकोशाचे 20 खंड पेन ड्राईव्हमध्ये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

मुंबई - मराठी विश्‍वकोशाचे 20 खंड 18163 लेखांसह एका पेन ड्राईव्हवर मिळणार आहेत. "मराठी भाषा दिना'निमित्ताने ग्रंथाली प्रकाशन आणि बुकगंगा डॉट कॉम यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

मुंबई - मराठी विश्‍वकोशाचे 20 खंड 18163 लेखांसह एका पेन ड्राईव्हवर मिळणार आहेत. "मराठी भाषा दिना'निमित्ताने ग्रंथाली प्रकाशन आणि बुकगंगा डॉट कॉम यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

मराठी विश्‍वकोशाचे सर्व खंड संस्थेच्या संकेतस्थळावर असले तरी अनेकदा ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट मिळत नसल्याने ते पाहता येत नाहीत. अशा वेळी पेन ड्राईव्हमधील विश्‍वकोश मदतीला येऊ शकतात. डेस्कटॉप कॉम्प्युटरवर आणि लॅपटॉपवर युनिकोडमध्ये ते वाचता येतील. "गेट वे ऑफ इंडिया' येथे होणाऱ्या "मराठी भाषा दिना'च्या कार्यक्रमात या पेन ड्राईव्हचे उद्‌घाटन करण्यात येणार. त्याची किंमत 800 रुपये आहे.
विश्‍वकोशांचा पेन ड्राईव्ह खरेदी करणाऱ्या पहिल्या 100 विद्यार्थ्यांना गुलजार यांचा "बोस्की' हा नऊ पुस्तकांचा संच (मूळ किंमत 1000 आणि पेन ड्राईव्ह 800 रुपये) सवलतीत म्हणजे 1200 रुपयांना मिळेल; तर पहिल्या 100 वाचकांना संकल्पना कोशाचे 5 खंड (मूळ किंमत 3200 आणि पेन ड्राईव्ह 800) सवलतीत 2600 रुपयांना मिळतील. अधिक माहितीसाठी संपर्क - 8888300300.

मॅजेस्टिकचीही सवलत
"मराठी भाषा दिना'निमित्त मॅजेस्टिक प्रकाशनाने आपल्या पुस्तकांवर 25 टक्के, तर अन्य प्रकाशकांच्या पुस्तकांवर 20 टक्के सवलत जाहीर केली आहे. ही सवलत 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीदरम्यान पुढील ग्रंथदालनात मिळेल. शिवाजी मंदिर (मुंबई) येथील मॅजेस्टिक ग्रंथ दालन, मॅजेस्टिक बुक डेपो (राम मारुती रोड ठाणे) आणि मॅजेस्टिक बुक गॅलरी (म्हात्रे पुलाजवळ, पुणे).

Web Title: marathi vishwakosh in pen drive