मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

डोंबिवली - जैनधर्मीयांत मुलांनी दीक्षा घेत साधू किंवा मुनी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत; मात्र डोंबिवलीतील अवघ्या 19 वर्षांचा एक मराठी तरुण जैन धर्माची दीक्षा घेणार असून जैन मुनी म्हणूनच आयुष्यभर धर्मप्रचाराचे काम करणार आहे. मंदार म्हात्रे असे या तरुणाचे नाव असून तो डोंबिवलीतील तुकारामनगर भागात राहतो. 27 एप्रिल रोजी हा ऐतिहासिक दीक्षा सोहळा पार पडणार आहे.

मंदार हा त्याच्या आई-वडिलांचा एकूलता एक मुलगा. बालपण मराठमोळ्या डोंबिवलीलेच. तो लहानपणापासून जैन मंदिरात जात असे. त्यामुळे त्याच्या मनात जैन धर्माबाबत वेगळी गोडी निर्माण झाली. ""17 वर्षांचा असताना माझी ओळख एका बालमुनींशी झाली आणि आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अनेक कठीण व खडतर मार्ग पार करत आज आपण इथवर येऊन पोहचलो आहे,'' असे मंदारने सांगितले. जे मंदारने साध्य केले ते आम्हालाही जमले नाही, असे मत जैन समाजातून व्यक्त केले जात आहे.

2014 मध्ये गुरु पूज्य अभ्यशेखर सुरी महाराज साहेब यांच्याशी ओळख झाली आणि आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. जैन मंदिरात जाऊन प्रवचने ऐकत असे. प्रवचने ऐकली की घरी जावेसेही वाटत नव्हते. दीक्षाप्राप्तीसाठी मोठे कठीण टप्पे पार केले आहेत.
- मंदार म्हात्रे

Web Title: marathi youth jain religion

टॅग्स