विवाहितेला धमकावणारा धारावीत अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मुंबई - पैशासाठी विवाहित महिलेला धमकावणाऱ्याला धारावी पोलिसांनी रविवारी (ता. 2) अटक केली. हारून शेख असे त्याचे नाव आहे. त्याला शुक्रवारपर्यंत (ता. 7) पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एक महिला फरारी आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत. 

पीडित महिला ही कुटुंबीयांसोबत धारावी परिसरात राहते. महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. गेल्या महिन्यात एका महिलेने तिला आपल्या घरी बोलावले होते. पीडित महिला तेथे गेली असता हारूनने गैरफायदा घेतला. तसेच मोबाईलने छायाचित्रे काढली. त्यानंतर हारूनने तिच्याकडे फोनवरून 20 हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास छायाचित्र असलेले पेनड्राईव्ह पतीला देण्याची धमकी दिली. घरची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर तो वारंवार त्रास देऊ लागल्याने अखेर पीडित महिलेने शनिवारी (ता. 1) धारावी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून हारूनला रविवारी अटक करण्यात आली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्याकडून अद्याप पेनड्राईव्ह जप्त करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.