मशिद बंदर येथे झोपडपट्टीला आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई - मध्य रेल्वेच्या मशिद बंदर (पू.) झोपडपट्टीला सोमवारी (ता. 23) सायंकाळी आग लागली. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले. त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीमुळे मध्य रेल्वेच्या लोकलही उशिराने धावत होत्या. मशिद बंदर पूर्वेला एलएलसी कंपाउंड आहे. रेल्वे रुळाला लागून असलेल्या झोपडपट्टीत कचरा, प्लॅस्टिकची गोदामे आहेत. सायंकाळी 6 वाजता अचानक झोपड्यांवर ठिणगी पडली आणि आगीने पेट घेतला. आगीमुळे दोन इमारतींचे प्रचंड नुकसान झाले. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या 17 फायर इंजिन दुर्घटनास्थळी पोचले. स्थानिक रहिवाशांनी चार जखमी लहानग्यांना उपचाराकरता जे. जे. रुग्णालयात दाखल केले.

मुंबई - मध्य रेल्वेच्या मशिद बंदर (पू.) झोपडपट्टीला सोमवारी (ता. 23) सायंकाळी आग लागली. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले. त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीमुळे मध्य रेल्वेच्या लोकलही उशिराने धावत होत्या. मशिद बंदर पूर्वेला एलएलसी कंपाउंड आहे. रेल्वे रुळाला लागून असलेल्या झोपडपट्टीत कचरा, प्लॅस्टिकची गोदामे आहेत. सायंकाळी 6 वाजता अचानक झोपड्यांवर ठिणगी पडली आणि आगीने पेट घेतला. आगीमुळे दोन इमारतींचे प्रचंड नुकसान झाले. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या 17 फायर इंजिन दुर्घटनास्थळी पोचले. स्थानिक रहिवाशांनी चार जखमी लहानग्यांना उपचाराकरता जे. जे. रुग्णालयात दाखल केले. परिमंडळ 2 चे उपायुक्त ज्ञानेश्‍वर चव्हाण घटनास्थळी पोचले. आगीचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. काही तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

मुंबई

मुंबई - अकार्यक्षम ठरलेल्या "बेस्ट'च्या 550 बस वर्षभरात भंगारात काढल्यानंतर आता 453 बस भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट...

04.24 AM

नवी मुंबई  - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वांत जास्त प्रदूषित हवा असणाऱ्या 17 शहरांची यादी जाहीर केली...

03.42 AM

मुंबई - हायप्रोफाइल दुहेरी हत्याकांडातील आरोपी चिंतन उपाध्यायने कारागृहात "स्वातंत्र्य' या विषयावर चित्र काढले आहे. ते चित्र...

02.48 AM