माथेरान: 'सन्मान स्त्रीत्वाचा' अंतर्गत माजी नगरसेविका ताराबाई कदम यांचा सन्मान

Matheran women's felicitation
Matheran women's felicitationsakal media

माथेरान : जागतिक महिला दिनानिमित्त (International women's day) सन्मान स्त्रीत्वाचा अंतर्गत पर्यटनस्थळ माथेरान (Matheran) येथे भाजप महिला मोर्चातर्फे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि कोविडकाळात अतुलनीय कामगिरी केलेल्या रणरागिणींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ माजी नगरसेविका ताराबाई कदम (Tarabai kadam felicitation) यांच्या कार्याची दाखल घेत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. माथेरानमधील श्रीराम मंदिर पटांगणात मंगळवारी (ता. ८) सायंकाळी हळदीकुंकू समारंभात (haldi kumkum event) महिलांचे खेळ आयोजित केले होते.

Matheran women's felicitation
रायगड जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने; कोरोना रुग्णसंख्या १० पेक्षा कमी

या कार्यक्रमात सन्मान स्त्रीत्वाचा अंतर्गत अभिनेत्री श्वेता पेंडसे व नृत्यांगणा राधिका फणसे यांच्या हस्ते २६ रणरागिणींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये १९७४ मध्ये माथेरानच्या नगरसेविकेचे पद भूषविलेल्या ताराबाई कदम यांचाही सन्मान करण्यात आला. नेरळ-माथेरान घाटरस्त्यासाठी महिलांना संघटित करून श्रमदानातून ७ किलोमीटरचा रस्ता तयार केला होता.

आज तो रस्ता माथेरानकरांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे. याप्रसंगी भाजप महिला अध्यक्षा संध्या शेलार, माजी अध्यक्षा बबिता शेळके, माजी नगरसेविका प्रतिभा घावरे, प्रियंका कदम, मनीषा पाटील, शैला पार्टे, कांचन केतकर, गीता जाधव, शीतल चौधरी, प्रणाली शिंदे, स्वर्णीमा वैद्य, सुरेखा शिंदे, साक्षी कदम, साक्षी भोसले, अक्षता पार्टे, राजश्री दळवी, स्वाती चौधरी, प्रियंका शेलार, मनीषा रेणोसे, सुनिता आखाडे यांनी विशेष परिश्रम केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com