पळसदरी-कर्जतदरम्यान आजपासून मेगाब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई - मध्य रेल्वेच्या पळसदरी व कर्जत स्थानकांदरम्यान गुरुवारपासून (ता.9) दोन दिवस तीन तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एक्‍स्प्रेस व लोकलच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. 

मुंबई - मध्य रेल्वेच्या पळसदरी व कर्जत स्थानकांदरम्यान गुरुवारपासून (ता.9) दोन दिवस तीन तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एक्‍स्प्रेस व लोकलच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. 

पळसदरी व कर्जतदरम्यान सकाळी 10 पासून दुपारी एकपर्यंत तातडीची दुरुस्तीची कामे रेल्वे करणार आहे. त्यामुळे हैदराबाद-मुंबई एक्‍स्प्रेस आणि कोईमतूर-एलटीटी या गाड्या पळसदरी स्थानकात थांबवण्यात येतील. खोपोलीहून कर्जतच्या दिशेने जाणारी सकाळी 10.20 आणि दुपारी 11.30 ची लोकल पळसदरी स्थानकापर्यंतच चालवण्यात येईल. कर्जतहून खोपोलीकरता सकाळी 10.55 आणि दुपारी 12.05 वाजता सुटणाऱ्या लोकल मेगाब्लॉकमुळे पळसदरी ते खोपोलीदरम्यान चालवल्या जातील, असे रेल्वेने कळवले आहे. 

Web Title: mega block palasdari to karjat