म्हाडाच्या 104 घरांना गिरणी कामगार मुकणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मुंबई  - म्हाडाने मेमध्ये गिरणी कामगारांच्या घराची सोडत काढली होती. त्यात घर मिळालेल्या तब्बल 104 कामगारांनी मुदतवाढीनंतरही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. यामुळे त्यांना घर मिळणार नाही. प्रतीक्षा यादीतील एवढ्याच कामगारांना ही घरे मिळतील.

सहा गिरण्यांच्या जमिनीवरील दोन हजार 634 घरांची सोडत म्हाडाने 9 मे रोजी काढण्यात आली. विजेत्या कामगारांना त्यांनी दिलेल्या पत्त्यावर मुंबई मंडळामार्फत प्रथम सूचनापत्रे पाठवण्यात आली. त्यातील 32 पत्रे काही कारणांमुळे परत आली. ही पत्रे कामगारांनी कार्यालयातून घेऊन जाऊन पात्रता निश्‍चितीसाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन म्हाडाने केले होते. तरीही या कामगारांसह काही विजेत्यांनी मुदतीमध्ये कागदपत्रे जमा न केल्याने म्हाडाने मुदतवाढ दिली. त्या काळात दोन हजार 530 कामगारांनी कागदपत्रे सादर केली. 104 कामगारांनी कागदपत्रे सादर न केल्याने त्यांना घराला मुकावे लागले आहे. विजेत्या कामगारांनी कागदपत्रे सादर न केल्याने प्रतीक्षा यादीतील कामगारांना संधी देण्यात येईल.

Web Title: Mhada 104 households wise mill workers

टॅग्स