म्हाडाच्या लॉटरीतील घरे ओसींविना रखडली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुंबई - घरांना ओसी नसतानाही म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2015-16 मध्ये लॉटरी काढली. या लॉटरीमध्ये विजेत्या ठरलेल्यांना ओसीअभावी अद्यापही घराचा ताबा मिळालेला नाही. दोन्ही लॉटरीतील सुमारे 900 घरांना अद्यापही ओसी मिळाली नसल्याने विजेते घराच्या प्रतीक्षेत आहेत. 

म्हाडामार्फत दरवर्षी घरांची लॉटरी काढण्यात येते. लॉटरीनंतर विजेत्यांची पात्रता निश्‍चिती होईपर्यंत बराचसा कालावधी लागतो. मात्र, म्हाडाच्या कारभारामुळे विजेत्यांना घराची प्रतीक्षा करावी लागत आहे. म्हाडाने 2015 मध्ये 1 हजार 16 घरांची लॉटरी काढली. यामधील 415 घरांच्या इमारतीची अद्याप ओसी मिळालेली नाही. तसेच 2016 मध्ये 957 घरांच्या लॉटरीतील 500 घरांना अद्यापही ओसी मिळालेली नाही. त्यामुळे पात्र ठरूनही अनेक विजेते आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. उर्वरित घरांची ओसी आल्याने त्यांना घराचा ताबा देण्यात आला असल्याचे, म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

यापूर्वीच्या लॉटरीतील काही घरांचा ताबाही म्हाडाने विजेत्यांना दिलेला नाही. असे असतानाच मुंबई मंडळाने यंदाच्या लॉटरीची प्रक्रिया सुरू केली आहे. यातील अनेक घरांना ओसी नसल्याने ही घरेही ओसीच्या कचाट्यात अडकण्याची शक्‍यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Mhada houses issue

टॅग्स