म्हाडाच्या कोकण मंडळाची यंदा 900 घरांची लॉटरी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

मुंबई - सर्वसामान्य नागरिकांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडातर्फे यंदाही घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मेमध्ये काढण्यात येणाऱ्या लॉटरीत सुमारे 900 घरांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये ठाण्यातील वर्तकनगर आणि विरारच्या बोळिंज येथील घरे असणार आहेत.

म्हाडातर्फे दर वर्षी घरांची लॉटरी काढण्यात येते. म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत लॉटरी काढण्याच्या हालचाली अधिकाऱ्यांनी सुरू केल्या आहेत. विरार बोळिंज आणि ठाण्यातील वर्तकनगर येथे तयार असलेल्या विविध उत्पन्न गटांतील घरांचा यंदाच्या लॉटरीत समावेश करण्यात येणार आहे. ठाणे येथे सुमारे 400; तर विरार येथील 500 घरांचा समावेश या लॉटरीत करण्यात येईल, असे कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उपलब्ध घरांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.