एमआयएम मुंबईत ७६ जागा लढवणार

एमआयएम मुंबईत  ७६ जागा लढवणार

ओवेसी बंधूंच्या होणार ३० सभा

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएम २२७ पैकी ७६ जागा लढविणार आहेत. ओवेसी बंधूंच्या उपस्थितीत मुंबईत ३० सभाही घेण्याचे ठरले आहे. यामुळे समाजवादी आणि काँग्रेसच्या व्होटबॅंकेला फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

एमआयएमने मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे. आतापर्यंत ओवेसी बंधूंच्या उपस्थितीत मुंबईत दोन सभाही झाल्या आहेत. नगरसेवकांच्या मुंबई महापालिकेत काँग्रेसचे ५२ आणि समाजवादी पक्षाचे ९ नगरसेवक आहेत. एमआयएमने मुस्लिम बहुल भागावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात मालवणी, कुर्ला, भायखळा, नागपाडा या भागांचा समावेश आहे. आजपर्यंत येथून सपा आणि काँग्रेसचे नगरसेवक निवडून येत होते. मुंबईतील मुस्लिम युवकांत एमआयएमबाबत कमालीचे आकर्षण आहे. त्यात एमआयएम दलित कार्डही खेळणार आहे. तिकीट वाटपात दलित उमेदवारांना प्राधान्य देण्याचे पक्षाने ठरवले आहे. त्यामुळे सेना, भाजप वगळता इतर पक्षांना एमआयएमचा मोठा धोका वाटत आहे. 

मतांच्या ध्रुवीकरणाचा सेना-भाजपला फायदा
युतीने झोपडपट्टी आणि मुस्लिम वस्त्यांना निधी देण्यात दुजाभाव केल्याचा मुद्दाही प्रचारात उपस्थित करणार असल्याचे एमआयएमच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. एमआयएमचा काँग्रेस, सपा व राष्ट्रवादीला फटका बसणार आहे; मात्र याचा फायदा आपोआप शिवसेना, भाजपला होण्याची शक्‍यता आहे.
 

ओबेसीच्या भाषणाकडे लक्ष
भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांचे ओवेसी बंधुंच्या भाषणाकडे बारिक लक्ष आहे. एमआयएमचे नेते जितकी वादग्रस्त विधाने करतील, जितका जहाल प्रचार करतील तितका सेना-भाजपला हवाच आहे. कारण त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण होण्यास मदत होईल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com