एमआयएम मुंबईत 76 जागा लढविणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई : मुंबई नगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएम 227 पैकी 76 जागा लढविणार आहे. ओवेसी बंधूंच्या उपस्थितीत मुंबईत 30 सभाही घेण्याचे ठरले आहे. यामुळे समाजवादी आणि कॉंग्रेसच्या व्होट बॅंकेला फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मुंबई : मुंबई नगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएम 227 पैकी 76 जागा लढविणार आहे. ओवेसी बंधूंच्या उपस्थितीत मुंबईत 30 सभाही घेण्याचे ठरले आहे. यामुळे समाजवादी आणि कॉंग्रेसच्या व्होट बॅंकेला फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

एमआयएमने मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे. आतापर्यंत ओवेसी बंधूंच्या उपस्थितीत मुंबईत दोन सभाही झाल्या आहेत. नगरसेवकांच्या मुंबई महापालिकेत कॉंग्रेसचे 52 आणि समाजवादी पक्षाचे 9 नगरसेवक आहेत. एमआयएमने मुस्लिम बहुल भागावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात मालवणी, कुर्ला, भायखळा, नागपाडा या भागांचा समावेश आहे. आजपर्यंत येथून सपा व आणि कॉंग्रेसचे नगरसेवक निवडून येत होते. मुंबईतील मुस्लिम युवकांत एमआयएमबाबत कमालीचे आकर्षण आहे. त्यात एमआयएमएम दलित कार्डही खेळणार आहे.

तिकीटवाटपात दलित उमेदवारांना प्राधान्य देण्याचे पक्षाने ठरवले आहे. त्यामुळे सेना, भाजप वगळता इतर पक्षांना एमआयएमचा मोठा धोका वाटत आहे.
आजपर्यंत युतीने झोपडपट्टी आणि मुस्लिम वस्त्यांना निधी देण्यात दुजाभाव केल्याचा मुद्दाही एमआयएम प्रचारात उपस्थित करणार असल्याचे एमआयएमच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. एमआयएमचा कॉंग्रेस, सप व राष्ट्रवादीला फटका बसणार आहे. मात्र याचा फायदाही आपोआप शिवसेना, भाजपच्या उमेदवारांना होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई

मुंबई - आमचा नंदीबैल दररोज शेकडो आबालवृद्धांना आशीर्वाद देतो... आज आमच्या कुटुंबाला त्याच्या आशीर्वादाची आवश्‍यकता आहे......

05.06 AM

ठाणे - ठाणे स्थानकात उभारण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी सॅटीस पुलाला गळती लागली आहे. पावसाचे पाणी थेट पुलाखालून मार्गक्रमण...

04.15 AM

नवी मुंबई - आठवडाभर अधूनमधून पडणाऱ्या पावसाची शनिवारपासून संततधार सुरू झाली. त्यामुळे शहरातील रस्तेदुरुस्ती पुन्हा खड्ड्यांत गेली...

04.03 AM