एमआयएमच्या उमेदवाराचा  आत्महत्येचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंब्रा - एमआयएम या पक्षाने उमेदवारांकडून २० लाख उकळले आहेत. माझ्याकडूनही त्यांनी उमेदवारीसाठी २५ लाखांची मागणी करून पाच लाख घेतले. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि पैसे परत मिळून द्यावेत, अन्यथा त्यांच्या प्रचारसभेत जाळून घेऊ, असा इशारा ताजुद्दीन युनूस खान यांनी दिला आहे. स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्याने खान यांनी त्यांची तक्रार ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.  

मुंब्रा येथील ताजुद्दीन युनूस खान प्रभाग क्रमांक तीसमधले एमआयएमचे उमेदवार होते. पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी त्यांच्याकडे २५ लाखांची मागणी केली. ताजुद्दीन यांनी पाच लाख दिले होते. मात्र आणखी २० लाख देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे पक्षाने त्या प्रभागातली उमेदवारी इतरांना दिली. त्यामुळे एमआयएमच्या नेत्यांकडून पाच लाख रुपये मला परत मिळवून द्यावेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ताजुद्दीन यांनी मुंब्य्रातल्या पत्रकार परिषदेत केली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

Web Title: MIM's candidates to commit suicide warning