'जोगेश्‍वरी पूर्व मेट्रो रेल्वे स्थानकाचे नाव ठाकरे ट्रॉमा केअर करा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

बांद्रा ते दहिसर पूर्व येथे मेट्रो-३ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मेट्रो रेल्वचेे जोगेश्‍वरी (पूर्व) येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर’ मनपा रुग्णालयाजवळ रेल्वे स्टेशन येत आहे. या मनपा रुग्णालयाजवळच उभारण्यात आलेल्या जोगेश्‍वरी पूर्व-पश्‍चिम जोडणार्‍या दक्षिण उड्डाणपुलासही  ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुल’ असे नावही देण्यात आले आहे. आता याच दोन्हीच्या जवळच मेट्रोचे रेल्वे स्टेशन येणार आहे.

मुंबई : पश्‍चिम द्रुतगती मार्गावरुन जाणार्‍या मेट्रोचे एक स्थानक जोगेश्‍वरी पूर्व येथे येत आहे.  जोगेश्‍वरी (पूर्व) येथील या मेट्रोच्या रेल्वे स्टेशनला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर’ असे नाव देण्यात यावे, असा लेखी प्रस्ताव जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी एमएमआरडीएच्या आयुक्तांना पाठविला आहे. 

बांद्रा ते दहिसर पूर्व येथे मेट्रो-३ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मेट्रो रेल्वचेे जोगेश्‍वरी (पूर्व) येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर’ मनपा रुग्णालयाजवळ रेल्वे स्टेशन येत आहे. या मनपा रुग्णालयाजवळच उभारण्यात आलेल्या जोगेश्‍वरी पूर्व-पश्‍चिम जोडणार्‍या दक्षिण उड्डाणपुलासही  ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुल’ असे नावही देण्यात आले आहे. आता याच दोन्हीच्या जवळच मेट्रोचे रेल्वे स्टेशन येणार आहे. 

असे असतानाही येथील रेल्वे स्थानकास  ‘जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड जंक्शन (जे.व्ही.एल.आर)’ असे नाव देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु प्रस्तावित मेट्रो रेल्वे स्थानक हे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर’ मनपा रुग्णालया शेजारी येत असल्याने लोकभावनेचा व स्थानिक नागरिकांच्या मानणीनुसार या स्थानकाचे नाव ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर’ असे करण्यात यावे, असा लेखी प्रस्ताव जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी एमएमआरडीए आयुक्तांना पाठविला आहे.