मीरा भाईंदरमध्ये अतिक्रमणांचा विळखा - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात भरपूर अतिक्रमणे झाल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत मंगळवारी दिली. 

मुंबई - मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात भरपूर अतिक्रमणे झाल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत मंगळवारी दिली. 

मीरा भाईंदरमध्ये अतिक्रमणे वाढल्याचा आरोप करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आनंद ठाकूर यांनी या प्रकाराला महापालिक प्रशासन आणि स्थानिक नेते जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांच्या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना फडणवीस यांनी अतिक्रमणे झाल्याची कबुली दिली. अतिक्रमणांचे सर्वेक्षण महापालिकेकडून करण्यात येत आहे. अतिक्रमणे पाडण्याचा आदेश आयुक्तांना दिला आहे. त्याचबरोबर काही बांधकामांबाबत न्यायालयात दावे प्रलंबित आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर पाडकाम मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. मात्र, तोपर्यंत संबंधिताच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली.