सफाळयातील टेंभीखोडावे येथील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचा सर्व्हे मनसेने उधळला

The MNS exhausted the survey for the bullet train project
The MNS exhausted the survey for the bullet train project

सफाळे - बहुचर्चित आणि भाजपचा महत्वकांशी बुलेट ट्रेन प्रकल्पसाठीचा सर्व्हे आज बुधवारी (ता. 9) पालघर जिल्हयातील मौजे टेंभीखोडावे येथे सुरू असतांना मनसे सैनिकांनी अचानक हल्ला बोल करून, भूमापक कर्मचाऱ्यांचे उपकरणे फेकून होत असलेला सर्व्हे उधळून लावला आहे.

मागच्या आठवड्यात वसई येथे झालेल्या जाहीर सभेत बुलेट ट्रेन या विनाशकारी प्रकल्पाला राज ठाकरेंनी यांनी जोरदार विरोध दर्शवित, वेळप्रसंगी बुलेट ट्रेनचे रूळ उघडून टाका असा आदेशच कार्यकर्त्यांना दिला होता. त्या अनुषंगाने सर्वत्र मनसे आक्रमक रित्या या प्रकल्पाचे मनसुबे उधळून लावीत आहे.

शासनाच्या वेळेपत्रकानुसार बुलेट ट्रेन प्रकल्पा साठीचा सर्व्हे आज हनुमान नगर, राणीशिगाव, बोईसर येथून सुरू होणार होता. परंतु, मनसेचा होणारा विरोध टाळण्यासाठी धास्ती घेतलेल्या अधिकाऱ्यांनी हा सर्व्हे सफाळयातील टेंभीखोडावे येथून सुरू करण्याची रणनीती आखली होती. पण तत्पर मनसे सैनिकांनी याचा सुगावा घेऊन, टेंभीखोडावे येथे सुरू असलेला सर्व्हे आज उधळलून लावला आणि भूमापक कर्मचाऱ्यांना जागेवरून हुसकावून, मोजमाप साठीचे उपकरणे फेकून दिले आहेत. अशा प्रकारे मनसे अत्यंत आक्रमकपणे हा मुद्दा हाताळणार आहे हे स्पष्ट आहे.

बुलेट ट्रेनला एक इंचही जमीन तर देणार नाहीच, पण एक इंच जागेचा सर्व्हेही आम्ही होऊ देणार नसल्याचा इशाराच मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला आहे. या जिल्ह्यातील भूमिपुत्र, शेतकरी आणि आदिवासी बांधव देशोधडीला लागणार असल्याची भीती व चिंता संखे यांनी व्यक्त केली आहे.

आज घेतलेल्या या आंदोलनात मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे, उपजिल्हा अध्यक्ष अंनत दळवी, पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, मनविसे पालघर जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी, उपजिल्हा अध्यक्ष धिरज गावड, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष सागर शिंदे, उपतालुका अध्यक्ष मंगेश घरत, संदीप किणी, विभाग अध्यक्ष वैभव घरत, सचिन किणी, वैभव नाईक, मनवीसे उपतालुका अध्यक्ष जालीम तडवी, चिरंतन पाटील, टेभिंखोडावे शाखा अध्यक्ष दीनेश पाटील,उपशाखा अध्यक्ष सुधीर पाटील, मिलिंद पाटील, देवराम पाटील, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा निर्मितीनंतर चार वर्षाच्या कालावधीत आम्हाला दिले काय? रोजगार, कुपोषण, ढासळलेली आरोग्य सेवा आदी समस्यामध्ये जखडून आता बुलेट ट्रेन आणि वाढवण बंदर आदी विनाशकारी प्रकल्प राबवून आम्हाला उध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे. हे मनसुबे कदापी सहन केले जाणार नसल्याचे पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत यांनी सांगून, या पुढे एकाही शासकीय अधिकाऱ्याला परिसरात फिरू न देण्याचा निर्धार व्यक्त केला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com