मनसे नेते राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन 

मनसे नेते राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन 

डोंबिवली : मनसेे नेते प्रमोद (राजू ) पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण डोंबिवली शहराच्या वतीने बुधवारी डोंबिवली शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

सकाळी अकरा वाजता डोंबिवली एमआयडीसी येथील अस्तित्व या मतिमंद आणि गतिमंद विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळेत मनसे जिल्हा आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच, शाळेच्या आवारात सुरू असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देखील दिवसभराचे भोजन मनसेच्या वतीने प्रायोजित करण्यात आले तसेच संस्थेला देणगी देऊन गौरविण्यात आले. यासाठी विनोद  रतन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

डोंबिवलीतील कल्याण शीळ रोडवर गेल्या काही महिन्यांपासून नव्याने उघडण्यात आलेल्या व प्रथितयश अशा नाहर या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज सवलतीच्या दरामध्ये काही योजना राबविल्या गेल्या. त्यासोबतच त्या ठिकाणी एका आरोग्य शिबिराचेदेखील आयोजन करण्यात आले असून  या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिवसभरात  शास्त्रीनगर रुग्णालयातील रुग्णांना तसेच विष्णूनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फळवाटप कार्यक्रम, डोंबिवली जिमखान्यासमोरील जननी आशिष या अनाथालयातील मुलांना आवश्यक वस्तूंचे वाटप तसेच देणगी देण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 

कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक राहुल कामत, जिल्हा सचिव  प्रकाश माने, शहर अध्यक्ष  मनोज घरत, शहर अध्यक्षा  मंदाताई सुभाष पाटील, शहर सचिव  अरुण जांभळे, महिला शहर सचिव.कोमल पाटील, शहर संघटक  मनोज राजे,  संजीव ताम्हाणे, उपशहर अध्यक्ष  दिपक शिंदे, उपविभाग अध्यक्ष विशाल बढे,   मिहीर दवते, परभणी तालुका अध्यक्ष  निलेश पुरी, महाराष्ट्र सैनिक हेमंत दाभोळकर, उपविभाग अध्यक्षा अंजना भोईर, महिला शाखा अध्यक्ष ज्योती खवसकर,  मेधा चोरगे व पदाधिकारी उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com