दादरमध्ये आज मनसेचा मेळावा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई - शिवसेनेने टाळी न दिल्याने मंगळवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उमेदवारांच्या यादीवर अंतिम हात फिरवण्यात आला असून, बुधवारी (ता. 1) शिवाजी मंदिरात होणाऱ्या मेळाव्यात ही यादी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. मनसेच्या प्रचाराची दिशा या वेळी स्पष्ट होणार असून, मनसेचे मुख्य लक्ष्य भाजपच राहील. शिवसेनेबाबत राज ठाकरे काय भूमिका जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मंगळवारच्या बैठकीत देईन तो उमेदवार स्वीकारा, असे आदेशच राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. विभागांमधून आलेल्या यादीवर अंतिम हात फिरवण्यात आला आहे. मात्र, या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या प्रचाराची दिशा सांगण्यात आलेली नाही. ती दादरमधील मेळाव्यात स्पष्ट होईल. मुंबई तोडण्यासारख्या भावनिक मुद्द्यांबरोबरच भाजपकडून आतापर्यंत देण्यात आलेल्या आश्‍वासनांची चिरफाड या वेळी करण्यात येणार आहे. मनसेचा आतापर्यंतचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असलेल्या शिवसेनेबाबत राज काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकमध्ये आणि मुंबईत मनसेच्या नगरसेवकांच्या प्रभागांत झालेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणूक लढवण्याची तयारी मनसेने केली असल्याचे समजते. 

किती उमेदवार देणार? 
मनसेने 2012 मध्ये 227 जागा एकट्याने लढवल्या होत्या. आता मनसेची तेवढी ताकद राहिलेली नाही. मनसेच्या उमेदवारांमुळे शिवसेनेलाही फटका बसणार आहे. त्यामुळे मनसे या निवडणुकीत किती जागा लढवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुंबई

बेलापूर - सीबीडी बेलापूर येथील बेलापूर जंक्‍शन हा उरण रोडवरील महत्त्वाचा चौक आहे. या मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने येथील...

05.03 AM

नवी मुंबई - जागतिक युवा सप्ताहाचे औचित्य साधत सामाजिक संस्था, सरकारी रुग्णालये आणि विद्यालयांत एड्‌स जनजागृती कार्यक्रमाचे...

04.33 AM

कल्याण - प्लॅस्टिकची अंडी, चीनी अंडी, अंड्यात प्लास्टिक निघाले, अशा तक्रारींच्या धर्तीवर अन्न व औषध ठाणे विभागाच्या पथकाने...

04.03 AM