अधिकाऱ्यांना नाल्यात उभे करण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

मुंबई - पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या नालेसफाईवरून आता राजकारण तापले आहे. यंदा पावसाळ्यात नाले तुंबल्यास पालिकेच्या अधिकाऱ्यांना नाल्यात उभे करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका प्रशासनाला दिला आहे.

नालेसफाईच्या कामात अनेक कंत्राटदारांना झुकते माप दिले जात आहे. यामुळे नालेसफाई योग्य प्रकारे होत नाही. अशा परिस्थितीत पावसाळ्यात मुंबईत पूर आल्यास आपल्याला नाल्यांमध्ये उभे करण्यात येईल, असे पत्र मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख लक्ष्मण व्हटकर यांना दिले आहे. गेल्या वर्षी देशपांडे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पालिकेच्या अभियंत्याला उभे केले होते. यामुळे देशपांडे यांच्यासह माजी नगरसेवक संतोष धुरी यांना तुरुंगात जावे लागले होते.