बॉंबच्या अफवेमुळे मॉडेलला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

मुंबई - माझ्या मैत्रिणीची बॅग काळजीपूर्वक तपासा, बॅगेत बॉंब असू शकतो, असे चेष्टेत सुरक्षारक्षकाला सांगणाऱ्या एका मॉडेलला शनिवारी येथील विमानतळावर अटक करून जामिनावर मुक्त करण्यात आले.

मुंबई - माझ्या मैत्रिणीची बॅग काळजीपूर्वक तपासा, बॅगेत बॉंब असू शकतो, असे चेष्टेत सुरक्षारक्षकाला सांगणाऱ्या एका मॉडेलला शनिवारी येथील विमानतळावर अटक करून जामिनावर मुक्त करण्यात आले.

या मॉडेलने केलेल्या मस्करीमुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांची धांदल उडाली. काही वेळातच केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बलाचे (सीआयएसएफ) जवान तेथे आले. त्यांनी पुन्हा बॅगेची तपासणी केली. ती सुरू असताना, "आपण बॉंब असल्याचे मस्करीत म्हटले होते', असे स्पष्टीकरण तिने दिले; परंतु या प्रकारामुळे विमानाचे उड्डाण एक तास लांबले. तिला "सीआयएसएफ'ने ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. सहार पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिची जामिनावर सुटका केली.