मोदींकडून जनतेचा विश्‍वासघात - उद्धव 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

मुंबई - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. अचानक नोट बदलण्याचा निर्णय चुकीचा असून, सर्व सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अचानक नोटा बदलून मोदींनी जनतेचा विश्‍वासघात केला असून, जनतेने आता "सर्जिकल स्ट्राइक' केल्यास सरकारला ते भारी पडेल, अशी टीका करत उद्धव यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. 

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या निर्णयावर जोरदार टीका केली. ""देशातून काळा पैसा हद्दपार करावा, या योजनेला विरोध नाही. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जो धाडसी निर्णय घेतला आहे, तो अंगाशी येतोय, असे वाटत आहे. नोटा बदलण्यासाठी बॅंकांसमोर सामान्य माणूस रांगा लावत आहेत. त्यांना होणारा त्रास बंद झाला पाहिजे. नाही तर जनता पुढील निवडणुकीत धडा शिकवेल,'' असा इशाराही उद्धव यांनी दिला. 

मुंबई

कल्याण : रेल्वे क्रॉसिंगचे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यासाठी मध्य  रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकानजीक रविवारी  9:15 ते...

07.12 PM

कल्याण : शनिवार रात्री पासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कल्याण डोंबिवली शहरात 4 झाड़े पडली तर पालिकेच्या अर्धवट रस्ते आणि...

06.18 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्‍मा, तसेच अमित शहा यांच्या...

05.09 PM