मुंबईत पावसाची दमदार बॅटींग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

मुंबई, ठाणे, कल्याण परीसरात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. हा पाऊस अजून दोन दिवस कोसळणार असल्याची माहिती वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दादर, परळ आदी परीसरात पाणी साचले आहे.

मुंबई - मुंबई शहर व उपनगरांमध्ये आज (रविवार) सकाळपासून दमदार पाऊस झाला असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. कळवा रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण परीसरात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. हा पाऊस अजून दोन दिवस कोसळणार असल्याची माहिती वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दादर, परळ आदी परीसरात पाणी साचले आहे.

शनिवार मध्यरात्रीपासूनच पाऊस सुरू राहिल्याने कुलाब्यात 52 मिमी तर सांताक्रूझच्या वेधशाळा केंद्रात 37 मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी आठ ते दहा दरम्यान शहरांत 34 मिमी आणि पूर्व भागांत 22 मिमी तर पश्चिम उपनगरांत 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. किनारपट्टीवरील भागांत ऑफ शोअर ट्रफ (कमी दाबाचा पट्टा) कार्यरत असल्याने पावसाने जोर धरल्याची माहिती वेधशाळा अधिकाऱ्यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मोदी खरे मित्र: डोनाल्ड ट्रम्प
मावळ तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा, 7/12 कोरा होणार
पुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस​
आंदोलनाचा अंशत: विजय : सुकाणू समिती​
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा​
संजय काकडेंची मेधा कुलकर्णींना फोनवरुन धमकी​
प्रतीकात्मक लढाई (श्रीराम पवार)​
सारीपाट राष्ट्रपतिपदाचा (अनंत बागाईतकर)​